मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News : जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक राजकुमार कावडिया (Rajkumar Kavadia, Chairman of Prakash Chandra Jain Multipurpose Organization) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकुमार कावडीया यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
जामनेरमधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची काही महिन्यापूर्वीच परवानगी रद्द करण्यात आली होती. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती पाडण्याचेही आदेश काढण्यात आले होते. संस्थेवर कारवाई होत असताना संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world