जाहिरात

VIDEO: 'तुझं आयुष्य बरबाद करेन..', थारमधून उतरला अन् मुलीला सपासप थप्पड मारल्या; पाहा थरकाप उडवणारा राडा

Shocking Video :  रस्त्याच्या मधोमध एका पांढऱ्या रंगाची थार कार थांबते आणि त्यातून एक तरुण खाली उतरतो. पुढच्या काही क्षणात तिथे जे काही घडलं, ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल

VIDEO: 'तुझं आयुष्य बरबाद करेन..', थारमधून उतरला अन् मुलीला सपासप थप्पड मारल्या; पाहा थरकाप उडवणारा राडा
मुंबई:

Shocking Video :  रस्त्याच्या मधोमध एका पांढऱ्या रंगाची थार कार थांबते आणि त्यातून एक तरुण खाली उतरतो. पुढच्या काही क्षणात तिथे जे काही घडलं, ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. संतापलेला हा तरुण एका मुलीवर तुटून पडतो आणि तिला एकामागून एक सपासप थप्पड मारू लागतो. 

तू कोणाला नडली आहेस हे तुला माहिती नाही, मी तुझं पूर्ण आयुष्य खराब करून टाकेन, अशी धमकी तो भररस्त्यात ओरडून देत होता. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोकही सुन्न झाले, पण दुर्दैवाने कोणीही मदतीला धावून आलं नाही.

शिवीगाळ आणि मारहाणीचा थरार

हा सर्व हायव्होल्टेज ड्रामा पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये घडला आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काळ्या रंगाची बनियान घातलेला एक तरुण एका मुलीचे केस पकडून तिला खेचत आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुणही तिथेच उभा असून तो दुसऱ्या एका मुलीला पकडून ठेवतो. 

मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी जोरात ओरडत आहे, मदतीसाठी याचना करत आहे, पण तो तरुण तिला सोडायला तयार नाही. दोघेही एकमेकांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्रात स्पष्ट दिसत आहे.

(नक्की वाचा : Instagram Friend बनला हैवान! भररस्त्यात तरुणीसोबत केले अश्लील चाळे, पाहा VIDEO )

नशेत धुंद तरुण आणि लोकांची उदासीनता

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, गाडीतील तरुण आणि तिथे असलेल्या मुली दोघेही नशेच्या धुंदित असल्यासारखे वाटत होते. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि तरुणाने मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. 

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता, तिथे अनेक लोक उभे होते. मात्र, त्या मुलीला वाचवण्याऐवजी किंवा हा वाद मिटवण्याऐवजी लोक आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पाहून संताप व्यक्त केला जात आहे.

( नक्की वाचा : Student Death: मम्मी-पप्पा, मला माफ करा! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने का संपवले स्वतःचे आयुष्य?, मोठा खुलासा )

आयुष्य खराब करण्याची धमकी 

बराच वेळ राडा घातल्यानंतर तरुण आपल्या थार गाडीत बसून निघू लागतो. तेव्हा ती मुलगी त्याला रोखण्यासाठी गाडीच्या दिशेने धावते. मात्र, तो तरुण तिला जोरात धक्का देतो आणि ती मुलगी रस्त्यावर कोसळते. जाताना तो मोठ्याने ओरडून सांगतो की, हिला नीट समजावून सांगा, नाहीतर मी हिचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. 

तो कार वेगाने पुढे नेतो आणि मुलगी पुन्हा कार अडवण्याचा प्रयत्न करते, मात्र तो कार थांबवत नाही. यात ती मुलगी पुन्हा जमिनीवर पडते. तिथे असलेल्या एका पांढऱ्या शर्टमधील तरुणाने तिला सावरण्याचा प्रयत्न केला.

चंदीगडसारख्या शहरात भररस्त्यात एका मुलीला अशा प्रकारे मारहाण आणि धमकावल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ इतका व्हायरल होऊनही चंदीगड पोलिसांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा अद्याप कोणावर कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

इथे पाहा संपूर्ण VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com