Shocking Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख किती भयानक वळण घेऊ शकते, याचा प्रत्यय आणून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीवर भररस्त्यात हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मैत्रीचा चुकीचा अर्थ काढून एका सनकी तरुणाने तरुणीला जाहीरपणे त्रास दिला आणि मारहाण केली.
ओळखीचे रुपांतर छळात
ही संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरात घडली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिची आणि आरोपी नवीन कुमार याची ओळख 2024 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती.
त्यांच्यात सुरुवातीला फोन आणि मेसेजवरून संवाद होत होता. मात्र, काही काळानंतर नवीनने या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात करण्यासाठी तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता, मात्र तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. तिच्या नकाराने संतापलेल्या नवीनने अखेर टोकाचे पाऊल उचलले.
( नक्की वाचा : Student Death: मम्मी-पप्पा, मला माफ करा! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने का संपवले स्वतःचे आयुष्य?, मोठा खुलासा )
दिवसाढवळ्या भररस्त्यात अमानुष कृत्य
ही घटना 22 डिसेंबर रोजी दुपारी 3:20 च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यानुसार, पीडित तरुणी एका स्कूटीजवळ उभी होती. यावेळी नवीन तिथे कार घेऊन आला. त्याने प्रथम तरुणीची पर्स हिसकावून घेतली आणि ती तपासली.
त्यानंतर त्याने तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्याने तिला भररस्त्यात ओढत नेले आणि तिच्या डोक्यावर आणि पाठीवर वारंवार प्रहार केले. विशेष म्हणजे, यावेळी तिथे 2 ते 3 लोक उपस्थित होते, पण दुर्दैवाने कोणीही त्या तरुणीच्या मदतीला धावून आले नाही.
घटनास्थळ आणि पोलीस कारवाई
तरुणी राहत असलेल्या पीजी (पेइंग गेस्ट) निवासस्थानाबाहेरच हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी नवीन कुमार याला ताब्यात घेतले आहे. भररस्त्यात तरुणीचा विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी मैत्री करताना किती काळजी घ्यावी, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
इथे पाहा Video
🔴#BREAKING | On camera: Man slaps woman incessantly in broad daylight in Bengaluru as passersby watch
— NDTV (@ndtv) December 24, 2025
NDTV's @reethu_journo joins @ParmeshwarBawa with more details pic.twitter.com/jRWU8mMIZo
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world