Shocking news: चंद्रपूर हादरलं! गुप्तधनासाठी विधवा अन् कुमारिकांचा वापर, लैंगिक शोषण अन् अघोरी पूजा

आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडलेले चॅटिंग आणि व्हिडिओ पाहून पोलीसही हादरले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • चंद्रपूर जिल्ह्यात गुप्तधनाच्या लालसेसाठी विधवा महिला आणि कुमारिकांचा अघोरी पूजेसाठी वापर होत होता
  • वन्यजीव तस्करीच्या तपासात आरोपींच्या मोबाईलमध्ये अघोरी पूजेचे व्हिडिओ, महिलांचे नग्न फोटो आढळले आहेत
  • टेस्टर या कोडनेमखाली चालणाऱ्या रॅकेटमध्ये जवळपास पन्नास मध्यस्थ महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
चंद्रपूर:

अभिषेक भटपल्लीवार

राज्यात भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि अघोरी प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या लालसेपोटी विधवा महिला आणि कुमारिकांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन्यजीवांची तस्करी पकडल्यानंतर या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला. अघोरी विधींच्या प्रकाराने सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यजीव तस्करीच्या तपासातून समोर आलेले हे रॅकेट केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित नसून, त्यामागे महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे असल्याचे स्पष्ट होत आहे. 'टेस्टर' नावाच्या कोडनेमखाली चालणारा हा प्रकार आधुनिक समाजासाठी लज्जास्पद असून, फरार मांत्रिकाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 12 एप्रिल रोजी दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईल तपासले असता, वनअधिकारीही चक्रावून गेले. त्यामध्ये वन्यजीव तस्करीसोबतच स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ, घुबडांचे फोटो आणि अनेक महिलांचे खासगी फोटो आढळले. त्यात नग्न फोटोंचा ही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही ठेवली होती. 

Advertisement

नक्की वाचा - Amravati Exclusive: परतवाडा प्रकरणात 180 मुलींच्या Viral Video चं वास्तव आलं समोर, एसपींचा मोठा खुलासा

या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पसरलेले आहे. यामध्ये जवळपास 50 मध्यस्थ सक्रिय असून ते महिलांना शोधण्याचे काम करत होते. या वर्तुळात मांत्रिकाला 'टेस्टर' म्हटले जायचे. एखादी महिला किंवा प्राणी पूजेसाठी 'योग्य' आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवत असे. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अनेक लोकांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत मांत्रिकांनी महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, नागरिकांनी अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा - Kalyan News: धक्कादायक! जेल परिसरातून नवऱ्याचा बायकोला फोन! केस मागे घेण्यासाठी दिली धमकी

या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हरीभाऊ पाथोडे यांनी सांगितले की, विधवा आणि कुमारिका सहज सावज ठरत असल्याने त्यांचे शोषण केले जाते. सध्या 6 आरोपी वनकोठडीत असून मुख्य मांत्रिक अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलीस विभागाकडे सोपवला जाणार आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडलेले चॅटिंग आणि व्हिडिओ पाहून पोलीसही हादरले आहेत. ५० जणांची फौज 'शिकार' शोधण्यासाठी तैनात होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असून, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.