अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chadrapur News : वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या विरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे याबाबतचा चौकशी अहवाल आला असून पोलीस महासंचालकांना हा चौकशी अहवाल पाठवला जाणार आहे.
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोलपंपासमोर वाळू भरलेला एक हायवा पकडला आणि चिमूर पोलीस ठाण्यात तो हायवा पार्क करण्यात आला. मात्र या ट्रकची फिर्याद, जप्ती पंचनामा किंवा स्टेशन डायरीत नोंदच करण्यात आली नाही. त्यामुळे तब्बल दहा दिवस हा हायवा पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत उभा राहिला.
नक्की वाचा - Jalgaon News : वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द, संस्थेच्या संचालकांचं धक्कादायक पाऊल
दरम्यान या हायवामधील वाळू चोरीची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आणि आता हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मते याबाबतचा अहवाल ते लवकरच नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवला जाणार आहे.