
ऐन दिवाळीत चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
आजोबा आणि नातवाचं नातं अनोखं असतं. आजोबांचा सर्वाधिक जीव त्यांच्या नातवावर असतो. ते त्याचे सर्व लाड पुरवतात. आई-बाबा रागावले तर आजोबाच त्याला जवळ घेतात. नातवाला जरा काही झालं तर त्यांचा जीव कासाविस होतो. अशातच आपल्या नातवाला वाचवायला गेलेल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - Dog bite: कुत्रा चावला पण दुर्लक्ष केलं, 2 महिन्यांनी तरुणाची भीषण अवस्था; तडफडत रुग्णालयातच मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील ही घटना असून रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असं वाहून गेलेल्या नातू आणि आजोबांचं नाव आहे. काल हे दोघं बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढा च्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world