जाहिरात

Chandrapur Mayor : चंद्रपुरात महापौरपदावर भाजपसह काँग्रेसचाही दावा; ठाकरे गट ठरणार किंगमेकर?

चंद्रपुरात ठाकरेंची सेना किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ देणार की भाजपची? असा सवाल उपस्थित होतो. 

Chandrapur Mayor : चंद्रपुरात महापौरपदावर भाजपसह काँग्रेसचाही दावा; ठाकरे गट ठरणार किंगमेकर?

Chandrapur News : राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल समोर आले आहेत. अनेक महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने नगरसेवक पळवा-पळवीची भीती व्यक्त केली जात आहे. चंद्रपुरातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. चंद्रपुरात महापौरपदावर भाजप आणि काँग्रेसने दावा केला आहे. चंद्रपुरात ठाकरेंची सेना किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ देणार की भाजपची? असा सवाल उपस्थित होतो. 

चंद्रपुरातील जागांचं गणित...

चंद्रपूर - ६६ जागा 
भाजप - २३
शिवसेना - १
काँग्रेस - २८
ठाकरे सेना - ६
BSP - १
वंचित आघाडी  - १
MIM - १
स्वतंत्र - २

(चंद्रपुरात बहुमताचा आकडा ३४ आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आले तर ३४चा आकडा गाठणं शक्य आहे. दुसरीकडे बहुमतासाठी भाजपला ११ नगरसेवकांची गरज आहे)

Malegaon News :मालेगावचा महापौर कोण? बहुमतासाठी तिघांची गरज; 'इस्लामचा' सत्तेचा घरोबा नेमका कोणासोबत?

नक्की वाचा - Malegaon News :मालेगावचा महापौर कोण? बहुमतासाठी तिघांची गरज; 'इस्लामचा' सत्तेचा घरोबा नेमका कोणासोबत?

चंद्रपुरात भाजपचाच महापौर होईल - मुनगंटीवार

चंद्रपुरात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बुहमत मिळालेलं नाही. त्यामुळे लहान पक्षांचं महत्त्व वाढलंय. भाजपचं संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असतानाही भाजपनं महापौरपदावर दावा केला आहे. इतर पक्ष भाजपबरोबर येतील.  तसंच काँग्रेसच्या नगरसेवकांशीही चर्चा झाल्याचं सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसंच विविध पक्षांशी संवाद सुरू असल्याचंही मुनगंटीवार म्हणतायत. सध्या संक्रांतीचे दिवस आहेत. संक्रांतीला पेच सुटत असतात. चंद्रपुरात संवाद होईल आणि त्यातून प्रश्न सुटेल. झाला तर भाजपचाच महापौर होईल, नाहीतर आम्ही विरोधात बसू,” असे स्पष्ट शब्दांत मुनगंटीवार यांनी सांगितले.


काँग्रेस फुटीची भीती...

शहराच्या विकासासाठी जो कोणी भाजपसोबत येईल व सहकार्य करेल, त्याला सोबत घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. याच वेळी त्यांनी सूचक विधान करत काही काँग्रेस नगरसेवकांशी चर्चाही झाल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अधिक तपशील देण्याचे त्यांनी टाळले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधून फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोबत युतीचे संकेतही मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळी चंद्रपूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती. यंदाही महापालिकेतल्या सत्तेसाठी भाजप आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांचं स्वबळावर महापौरपदाचं गणित जुळत नसतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने थेट महापौरपदाची मागणी केल्याने सत्तेचा पेच वाढलाय. चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत असलेले ठाकरे आता मविआच्या एकीला स्मरुन काँग्रेसबरोबर जाणार की जुना मित्र भाजपची साथ देणार, याची सर्वाधिक उत्सुकता आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com