जाहिरात

Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट

Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे

Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Crime News : संतोष लड्डा दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण
छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या घरातील दरोडा प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. 15 मे रोजी झालेल्या या प्रकरणाची सध्या राज्यभर चर्चा आहे. लड्डा अमेरिकेला असताना ही चोरी झाली. त्यामध्ये तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरी करण्यात आली होती. त्यानंतर या चोरीच्या मुख्य संशयित आरोपीचा एन्काऊन्टर झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. आता या सर्व प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. उद्योजक संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र बाळासाहेब इंगोले हाच या दरोड्याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आहे. या प्रकरणात पोलिसांनी इंगोलसेह चार जणांना अटक केलीय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहे इंगोले?

या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब इंगोले हा उद्योगपती लड्डा यांचा वर्गमित्र आहे. तो लड्डा यांच्या गावचाच आहे. तसंच लड्डा यांच्यासोबत कंपनीमध्ये कामही करत होता. बालपणीचा मित्र असल्यानं लड्डा यांच्या घरात त्याचा वावर होता. त्यामुळे त्याला घरातील संपूर्ण गोष्टीची माहिती होती. 

इंगोलेनं ही सर्व माहिती या प्रकरणात अटक झालेला दुसरा आरोपी आदिनाथ जाधवला सांगितली. त्यानं ती आणखी दोघांना आणि नंतर नानासाहेब शिंदे तसंच दरोडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला दिली. महत्त्वाचं म्हणजे या दरोड्यापूर्वी या सर्वांनी एकत्र बैठक घेतली. या बैठकीत दरोड्याचा कट शिजला. त्यानंतर ही चोरी झाली.

( नक्की वाचा : Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात )

ही चोरी झाली त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम होती. ही माहिती दरोडेखोरांना देण्यात आली होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी लड्डा यांनी ही रक्कम घरातून हलवली होती. त्यामुळे ही रक्कम वाचली. पण, सोनं चोरीला गेलं. डिसेंबर महिन्यात लड्डा आणि इंगोले यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादातून इंगोलेनं हे सर्व केलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

किती झाली होती चोरी?

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात चोरी झाली होती. यामध्ये तब्बल आठ किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरी करण्यात आली होती. 15 मेच्या रात्री एक वाजून 53 मिनिटांनी हा दरोडा घालण्यात आला होता. 

संतोष लड्डा हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाइचे आहेत.. त्यांची वाळून एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो PVT नावाची कंपनी आहे. ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईनसाठी पार्ट बनवते. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो. त्याच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा पत्नीसह अमेरिकेला गेले होते. त्यावेळी संधी साधत त्यांच्या घरावर दरोडा टकण्यात आला.

लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलं. अमोल खोतकर हा संशयित आरोपी त्यामध्ये ठार झाला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com