Chhatrapati Sambhaji Nagar News: एका तरुणानं प्रेम प्रकरणातून प्रेयसीला घाटाच्या व्ही पॉईंटवरुन ढकलून दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संभाजीनगरच्या दौलताबाद घाटातील ही घटना आहे. या घटनेत तरुणीच्या जागीच मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्या वादातून तरुणाने मुलीला घाटातून ढकलून दिले. सुनील खंडागळे असे आरोपीचे नाव असून, दीपाली त्रिभुवन असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर सुनील स्वतः शिऊर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली त्या दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : Hotel Bhagyashree: हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा आत्मदहनाचा इशारा, पोलिसांवर केला गंभीर आरोप, Video )
घटनास्थळी धाव घेतली असून, फॉरेन्सिक विभागाची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. तर अग्निशमक दलाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करत मुलीचा मृत्यूदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान सुनीलने दिपीलीला घाटावरून खाली का फेकलं आणि त्यांच्यात नेमका काय वाद झाला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.