Crime News: किरकोळ भांडण.. रक्तबंबाळ सून, दृश्य पाहून सासूने जीव सोडला, घरगुती वादातून भयंकर घडलं!

रक्तबंबाळ सुनेला पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसला अन् तिने क्षणात जीव सोडला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेने बीड बायपास परिसर हादरला.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना:

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुनेने स्वतःच्या हाताची नस कापताच ७६ वर्षीय सासूचा धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. वृद्धेचा मृत्यू हा 'डेथ ड्यू टू शॉक' असल्याचे निष्पन्न झाले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे संपुर्ण प्रकरण? जाणून घ्या..

सासु सुनेचा वाद, जाग्यावर जीव गेला... 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सासू सुनेचे वाद काही नवीन नाहीत. प्रत्येक घरात सासू सुनेमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळतात. अनेकदा हे वाद वाढतात, अबोला धरला जातो. मात्र पुन्हा सगळं काही सुरळित होतं. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये सासू सुनेच्या वादातून एक भयंकर घटना घडली आहे ज्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. 

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरात हा प्रकार घडला. या भागातील एका घरामधील  सासू-सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद उफाळला. या वादातून संतापून सुनेने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, शेजाऱ्यांची धाव व रक्तबंबाळ सुनेला पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसला अन् तिने क्षणात जीव सोडला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेने बीड बायपास परिसर हादरला.

Shocking CCTV: ॲसिड अटॅकची धमकी, मॉडेलच्या अंगावर कार घातली, फरफटत नेलं, हादरवणारा VIDEO

सुनेची प्रकृती गंभीर..

घटना घडल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेला शुद्ध आली नाही. काहींनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले. तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता.  दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्याने सुनेची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

घटनेची माहिती कळताच साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातीला घाटी रुग्णालयात ७६ वर्षीय वृद्धेला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. दरम्यान, त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सायंकाळी अहवालात वृद्धेचा मृत्यू 'डेथ ड्यू टू शॉक' असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

Topics mentioned in this article