जाहिरात

Shocking CCTV: ॲसिड अटॅकची धमकी, मॉडेलच्या अंगावर कार घातली, फरफटत नेलं, हादरवणारा VIDEO

'अरीना' इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हा थरार घडला असून, याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मोहम्मद शकील शेख (वय २९) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Shocking CCTV:  ॲसिड अटॅकची धमकी, मॉडेलच्या अंगावर कार घातली, फरफटत नेलं, हादरवणारा VIDEO

ऋतिक गणकवार, मुंबई:

Model  Dragged By Car CCTV Footage:  मुंबईचे उपनगर असलेल्या अंधेरी पश्चिम भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीच्या पश्चिम भागातून उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात एका मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.  ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मॉडेलच्या तक्रारीवरून मोहम्मद शकील शेख (वय 29) याच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मॉडेलच्या अंगावर कार घातली..! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंधेरीमधील उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात एका मॉडेलच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 'अरीना' इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हा थरार घडला असून, याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मोहम्मद शकील शेख (वय २९) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

 मॉडेल तरुणी आणि आरोपीमध्ये सोशल मीडियाव वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.  आरोपी शेख याने काही दिवसांपूर्वी पीडित मॉडेलच्या मैत्रिणीला स्नॅपचॅटवर ॲसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मॉडेलने आरोपीला गाठले असता, रागाच्या भरात असलेल्या शेखने तिला इमारतीच्या बाहेर बोलावले.

धक्कादायक CCTV फुटेज

तिथे वादावादी झाल्यानंतर त्याने आपल्या ताब्यातील 'स्कोडा' कार थेट मॉडेलच्या अंगावर घातली. ​धक्कादायक बाब म्हणजे, मॉडेलला वाचवण्यासाठी दोन नागरिक पुढे सरसावले असता, आरोपीने त्यांच्यावरही कार चढवण्याचा प्रयत्न केला. कारच्या बोनटची धडक लागल्याने मॉडेल काही अंतरापर्यंत फरफटत गेली, ज्यामध्ये ती किरकोळ जखमी झाली आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपीने मॉडेल तरुणीच्या अंगावरच कार घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी दोन तरुण तिच्या मदतीला धावले. ओशिवरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघातात मोठा ट्वीस्ट! सरपंचांचा खळबळजनक दावा, 'एक व्यक्ती उडी मारण्याचा...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com