Crime News: नवस केल्याचे सांगत शरीरसंबंधास नकार, पत्नीला समजलं पतीचं भयंकर सत्य, पुढे जे घडलं..

पतीचे पुरुषासोबत संबंध असल्याचे पत्नीला समजताच या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar Crime: समलैंगिक मुलाचे तरुणीशी लग्न लावून देत सासरच्या मंडळींनी तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून उघडकीस आली आहे. पतीचे पुरुषासोबत संबंध असल्याचे पत्नीला समजताच या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समलैंगिक तरुणाशी लग्न, तरुणीची फसवणूक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा समलैंगिक असल्याची माहिती असतानाही, ती लपवून एका तरुणीसोबत त्याचे लग्न लावून देण्यात आले. मे २०२५ मध्ये हा विवाह पार पडला होता. लग्नानंतर पतीने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, त्यासाठी त्याने 'देवाला नवस बोलल्याचे' खोटे कारण सांगितले. 

Mumbai News: मंत्री झेंडावंदन करणार, मुलगा फरार आरोपी; हायकोर्टाने असं झापलं की राज्यभर चर्चा झाली

मात्र, काही दिवसांतच पतीचे त्याच्या एका पुरुष मित्रासोबत संबंध असल्याचे उघड झाले आणि या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. जेव्हा पीडित तरुणीने या प्रकाराबाबत सासरच्यांकडे जाब विचारला, तेव्हा तिचे सांत्वन करण्याऐवजी तिला अतोनात छळ सोसावा लागला. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली आणि माहेराहून १५ लाख रुपये आणण्याची मागणी केली.

सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

 'तुला संसार सुख हवे असल्यास पैसे आण' अशी अट सासरच्यांनी घातली होती. या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे तरुणी पूर्णपणे खचून गेली होती. तिचे शैक्षणिक कागदपत्रे आणि दागिनेही सासरच्यांनी ताब्यात घेऊन तिला माहेरी पाठवून दिले. अखेर या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी तरुणीने छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती गणेशसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Balasaheb Thackeray : व्यंगचित्रकार ते लाडके हिंदुहृदयसम्राट.. बाळासाहेब ठाकरेंच्या 10 ग्रेट गोष्टी