महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या हिंसक राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या अटकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कडक शब्दांत कानउघाडणी केली. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पोलीस निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे भरत गोगावले यांना पहिल्यांदा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान मिळाला आहे. अशात या सगळ्या घडामोडींमुळे भरत गोगावली देखील अडचणीत सापडले आहेत.
न्यायालयाने काय म्हटले?
सुनावणीदरम्यान न्यायालयाचे अनेक टोकदार प्रश्न
न्यायालयाने याबाबत म्हटलं की, "राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत का की ते आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या मुलावर कारवाई करू शकत नाहीत? सर्व नागरिक समान आहेत, कोणीही 'विशेष नागरिक' नाही. जर सरकारला वाटले तर ते 24 तासांत कोणालाही अटक करू शकते."
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
विकास गोगावले फरार असल्याचे पोलीस सांगत असताना, त्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे ऐकून न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. "फरार व्यक्ती अर्ज कसा भरतो?" असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.
काय आहे महाड राडा प्रकरण?
2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. विकास गोगावले आणि महेश गोगावले यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या श्रीयश जगताप गटाने केला होता. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, तेव्हापासून ते पोलिसांना सापडत नाहीत.
(नक्की वाचा- Crime News: पतीला क्रूरपणे संपवलं, नंतर मृतदेहाशेजारी पॉर्न पाहत बसली; प्रियकरासह पत्नीला अटक)
मंत्र्यांचे आश्वासन आणि न्यायालयाचा अल्टीमेटम
अॅडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितले की, मंत्री भरत गोगावले आपल्या मुलाशी संपर्क साधतील आणि त्याला शरण येण्यास सांगतील. यानंतर न्यायालयाने, विकास गोगावले याला शुक्रवार सकाळपर्यंत पोलिसांत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. जर तो शरण आला नाही, तर न्यायालय कठोर आदेश देईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world