Crime News: भररस्त्यात दिवसाढवळ्या भयंकर कृत्य! असहाय्य तरुण, नराधमाने खाली पाडलं अन्... संतापजनक VIDEO

संभाजीनगरमध्ये एका तरुणाला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्या, मारामाऱ्या, लुटीचे गंभीर प्रकार वाढल्याचे दिसत आहे. भरदिवसा हत्येसारखे प्रकार घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरमध्ये एका तरुणाला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Vinayak Raut: केस कापले, गोमुत्र प्यायला दिले! बुवा- बाबांच्या जाळ्यात विनायक राऊतांची सून? गंभीर आरोप

नेमकं काय घडलं? 

छत्रपती संभाजीनगर शहरात चोरी, मंगळसूत्र हिसकावणे आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मुकुंदवाडीतील तथागत चौकात भरदिवसा लुटीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. मद्यधुंद अवस्थेतील एका गुन्हेगाराने बाहेरगावाहून आलेल्या तरुणाला अडवून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

हा प्रकार तेथून जाणारे सतर्क युवक योगेश सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी प्रथम संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रीत केली आणि त्यानंतर तात्काळ तरुणाच्या मदतीसाठी धाव घेत गुन्हेगाराला पकडले. यावेळी संतप्त नागरिकांनीही गुन्हेगाराला चांगलाच चोप दिला आणि पीडित तरुणाची सुटका केली. या धाडसी प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव सामूहिक अत्याचार प्रकरणातील  मुख्य आरोपीला अटक 

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील १५वा आणि मुख्य फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अशपाक इमान तडवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली होती. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

नक्की वाचा - Lohagad Case: सिया-चेतननेच केतनचा खून केला हे पुणे पोलीस कसं सिद्ध करणार? आरुषी प्रकरणात जे घडलं तेच आता...