Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या 26 वर्षांच्या पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आला. उस्मानपुरा भागातील अमृत साई एकदंत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. दीपेश राजू तनवाणी असं या तरुणाचं नाव आहे. 'माफ करा सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,' या आशयाची इंग्रजीमध्ये सुसाइड नोट लिहून ठेवत दीपेशने आपलं जीवन संपवलं आहे. तसेच काही व्यवहारांची आकडेमोड सुद्धा सुसाइड नोटमध्ये आहे. ही आकडेमोड नेमकी कसली आहे, यात किती गुंतवणूक आहे याबाबत तपास केला जात आहे.
नक्की वाचा - Kopargaon Crime: दुसऱ्या संसारासाठी पहिल्या पत्नीला संपवलं; फॅमिली कोर्टाजवळच...; अखेर पतीने केला मोठा खुलासा
सुसाइड नोट जशीच्या तशी
'माफ करा, सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याबद्दल मला खूप खंत आहे. मी जो असायला हवा होतो, तसा मी राहू शकलो नाही, ही माझी चूक आहे. यात कुणाचाही दोष नाही, फक्त माझाच आहे. मी सगळ्यांना त्रास दिला, कुणालाही आनंदी ठेवू शकलो नाही, फक्त दुःख दिलं ही माझी चूक आहे. माफ करा. आय लव्ह यू.