36 लाखांची खंडणी उकळल्यानंतरही शांत झाली नाही आग; छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराच्या पत्नीवर घरात घुसून वार

Chhatrapati Sambhajinagar Murder :रागाच्या भरात शैलाने घराचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला आणि महेंद्र सोनपेटकरबद्दल विचारणा सुरू केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Chhatrapati Sambhajinagar Crime : हत्या केल्यानंतर आरोपी शैला पळून न जाता घरातच बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar Murder: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज नगर परिसर बुधवारी दुपारी एका भयावह हत्येच्या घटनेने हादरून गेला.  एका 45 वर्षीय महिलेने आपल्या प्रेमीच्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. 40 वर्षीय साधना महेंद्र सोनपेटकर असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे, तर शैला सुनील सोनार असे हत्या करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे.

घरात काय घडलं?

आरोपी महिला शैला सुनील सोनार ही पूर्ण तयारीनिशी साधना यांच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी घरात साधना यांची सासू केशरबाई उपस्थित होत्या. साधनेची विचारपूस करत शैला तिथेच दबा धरून बसली होती. साधना मंदिरातून परतताच शैलाने त्यांच्याशी वाद घालायला सुरवात केली. 

Advertisement

रागाच्या भरात शैलाने घराचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला आणि महेंद्र सोनपेटकरबद्दल विचारणा सुरू केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शैलाने आपल्या पर्समधून पिस्तुलसदृश वस्तू काढून साधनेच्या डोक्याला लावली. तिने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.

( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )

सासूने दाखवलेले धैर्य पण...

या भीषण प्रसंगात सासू केशरबाई यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांनी झटापट करून शैलाच्या हातातील पिस्तुलसदृश वस्तू हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिली. मात्र यामुळे शैलाचा राग अधिकच अनावर झाला. तिने सोबत आणलेला स्प्रे साधना आणि केशरबाई यांच्या तोंडावर फवारला. या स्प्रेमुळे दोघींनाही डोळ्यांत तीव्र जळजळ होऊन त्या खाली कोसळल्या. 

असहाय्य अवस्थेत जमिनीवर पडलेल्या साधनेवर शैलाने चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला. सासू केशरबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनेला पाहून ओरडत राहिल्या, पण शैलाचे क्रूर रूप पाहून त्या हतबल होत्या.

( नक्की वाचा : Akola News: महाराजांनी लहान मुलाला दाताने पकडले? अकोल्याचा Video शेअर करण्यापूर्वी वाचा पोलिसांचा खुलासा )

हत्येचे कारण काय?

या क्रूर हत्येमागे अनैतिक संबंध आणि दीर्घकाळापासून असलेला वाद कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. 2024 मध्ये शैलाने मृत साधनेचा पती महेंद्र सोनपेटकर विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण करणे आणि पैशांचा व्यवहार अशा अनेक तक्रारी तिने केल्या होत्या. 

Advertisement

महेंद्र आणि शैला यांची ओळख 2009 मध्ये एका कंपनीत झाली होती. आरोपी शैलाने महेंद्रला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आतापर्यंत 36 लाख रुपये उकळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. महिनाभरापूर्वी शैला जबरदस्तीने महेंद्रच्या घरी राहायला आली होती, तेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढले होते.

आरोपी घरातच होती...

हत्या केल्यानंतर आरोपी शैला पळून न जाता घरातच बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून गर्दी केली, पण दरवाजा बंद असल्याने कोणालाही आत शिरता आले नाही. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. 

Advertisement

पोलिसांनी रक्ताने माखलेल्या शैलाला जागेवरूनच ताब्यात घेतले. घटनास्थळावरून चाकू, पिस्तुलसदृश वस्तू आणि स्प्रे जप्त करण्यात आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेचा क्रूर व्हिडीओ देखील आता समोर आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.