जाहिरात

Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम'

Dombivli News : मर्यादा ओलांडत जावेद खानने चक्क पैशांचे प्रलोभन दाखवले आणि तरुणीला लॉजवर भेटण्यासाठी बोलावले.

Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम'
Dombivli News : तो वाहनातून उतरताच नातेवाईकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. (प्रतिकात्मक फोटो)
डोंबिवली:

Dombivli News : डोंबिवलीमध्ये एका विवाहीत भंगार व्यावसायिकाला तरुणीची छेड काढणे चांगलेच महागात पडले आहे. कधीही ओळख नसताना, कधीही न भेटता केवळ मोबाईल नंबर मिळाल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवरून पैशांचे आमिष दाखवून लॉजवर बोलावणाऱ्या या तरुणाला तरुणीच्या नातेवाईकांनी फिल्मी स्टाईलने जाळ्यात पकडले. जावेद खान असे या आरोपीचे नाव असून, नातेवाईकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

वांगणी परिसरात राहणाऱ्या एका कॉलेज तरुणीला 19 एप्रिल रोजी एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. नंबर सेव्ह नसतानाही समोरची व्यक्ती सातत्याने चॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला त्या तरुणीने याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज येणे सुरूच राहिले. त्यामुळे ही तरुणी तणावात होती.

Latest and Breaking News on NDTV


मर्यादा ओलांडत जावेद खानने चक्क पैशांचे प्रलोभन दाखवले आणि तरुणीला लॉजवर भेटण्यासाठी बोलावले. हा प्रकार समोर येताच तरुणीने घाबरून न जाता हिंमत दाखवली आणि सर्व हकिकत आपल्या भावाला आणि नातेवाईकांना सांगितली. यानंतर नातेवाईकांनी जावेदला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन तयार केला.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय लग्नावरुन काका संतापले,माय-लेकांवर घरात घुसून हल्ला! )

नातेवाईकांचा सापळा आणि धुलाई

नातेवाईकांच्या सांगण्यावरून तरुणीने जावेदला डोंबिवलीत एका ठिकाणी भेटायला बोलावले. आपल्याला तरुणी भेटायला येणार या खुशीत जावेद आपल्या चारचाकी गाडीने ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. मात्र, तिथे तरुणीऐवजी तिचे संतप्त नातेवाईक आधीच दबा धरून बसले होते. तो वाहनातून उतरताच नातेवाईकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला थेट रामनगर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

जावेद खान हा शिरफाटा परिसरातील खान कंपाउंडमध्ये भंगार व्यवसाय करतो. विशेष म्हणजे तो विवाहित असूनही अशा प्रकारे तरुणींना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. तरुणी आणि जावेद यांच्यात पूर्वी कधीही ओळख किंवा संवाद झाला नव्हता. त्यामुळे या कॉलेज तरुणीचा मोबाईल नंबर जावेदकडे नेमका कोठून आणि कसा पोहोचला, याचा तपास आता रामनगर पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com