जाहिरात

Akola News: महाराजांनी लहान मुलाला दाताने पकडले? अकोल्याचा Video शेअर करण्यापूर्वी वाचा पोलिसांचा खुलासा

Akola News: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे

Akola News: महाराजांनी लहान मुलाला दाताने पकडले? अकोल्याचा Video शेअर करण्यापूर्वी वाचा पोलिसांचा खुलासा
Akola News: अकोल्यातील 'त्या' व्हायरल व्हिडिओवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (प्रतिकात्मक फोटो)
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील दृश्ये इतकी धक्कादायक आहेत की, ती पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाच्या अंगावर काटा येईल. एका महाराजांनी एका लहान मुलाला चक्क आपल्या दाताने कपड्याला पकडून हवेत फिरवल्याचा हा प्रकार व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा अघोरी कृत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 काय आहे हा व्हायरल व्हिडिओ?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती, ज्यांना स्थानिक लोक महाराज म्हणून संबोधित करत आहेत, ते एका लहान मुलाला अघोरी पद्धतीने हवेत फिरवताना दिसत आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला. 

बघता बघता हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. लोकांनी याला अंधश्रद्धेचा कळस म्हणत संताप व्यक्त करायला सुरुवात केली. मात्र, या व्हिडिओमागचे सत्य काही वेगळेच असल्याचे आता समोर आले आहे.

(नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )

पोलिसांचा महत्त्वपूर्ण खुलासा

या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास केला आणि वस्तुस्थिती समोर आणली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सध्याचा नसून काही वर्षांपूर्वीचा जुना प्रकार आहे. सध्या निंबा गावात किंवा मूर्तिजापूर तालुक्यात असा कोणताही अघोरी प्रकार घडलेला नाही. जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर फिरवून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेचा आणि सध्याच्या परिस्थितीचा कोणताही संबंध नसल्याचे आता अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर बसणार चाप?

सोशल मीडियाच्या युगात एखादी माहिती सत्य आहे की नाही हे न पडताळता ती फॉरवर्ड करण्याची मोठी लाट असते. याच वृत्तीमुळे अनेकदा शांतता भंग होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, कोणत्याही माहितीची शहानिशा केल्याशिवाय ती शेअर करू नका. निंबा गावातील हा प्रकार सध्याचा नसल्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. तसेच, अशा प्रकारचे जुने आणि वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करून शांतता बिघडवणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत.

( नक्की वाचा : Kalyan News: तुमच्याही घरी असा इलेक्ट्रिशियन येतोय का? कल्याणमध्ये महिलेला बसला 3 लाखांचा फटका )
 

आपल्या परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर पोस्ट किंवा व्हिडिओला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com