छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आईने मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील नारळा येथून हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चंद्रकला नावाच्या महिलेसह दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा मुलगा अमोलला दारूचं व्यसन होतं. तो सतत दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता. यामुळे संतापलेली पत्नी सात महिन्यांपूर्वी मुलगा आणि मुलगीला सोबत माहेरी निघून गेली. अमोलच्या वडिलांचं निधन झालं झाल्याने त्याची आई आणि तो वेगवेगळे राहत होते. मात्र पत्नी माहेरी गेल्यानंतर अमोल दारूच्या नशेत आईकडे चुकीची मागणी करीत होता.
नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन
त्यामुळे ही महिला वैतागली होती. एकदा चंद्रकला यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला हा सर्व प्रकार सांगितला. असा मुलगा असेल तर मारून टाका, असं त्या महिलेने सांगितलं. यानंतर चंद्रकला यांच्या डोक्यात मुलाच्या हत्येचा प्लान घोळू लागला. त्यांनी चंद्रकला हजारे यांनी किरणला 20 हजार रुपये दिले आणि अमोलची हत्या करण्याची सुपारी दिली. शेवटी मुलाची हत्या करण्यात आली.
अमोलच्या हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात चंद्रकला लक्ष्मण हजारे, वय वर्ष - 60, किरण रोहिदास गायकवाड, वय वर्ष - 25, विजय कचरू जाधव, वय वर्ष - 34, मंदाबाई बापूराव जानकर वय वर्ष - 45 यांना अटक करण्यात आलं आहे. पैसे घेऊन किरण गायकवाड याने विजय जाधव याला सोबत घेतलं. दोघांनी अमोलचा पाठलाग केला आणि दारू पिण्याच्या बहाण्याने संत एकनाथ उद्यानात नेलं. येथे त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडात चिखल टाकला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.