Santosh Ladda Robbery Case: तुळशी वृंदावनात सोनं लपवलं.. संतोष लड्डा दरोडा प्रकरणात मोठा ट्वीस्ट; रोहिणी खोतकरला अटक

आरोपी रोहिणीने नवीन सिमकार्ड घेतली आहे. तसेच तीन संशयास्पद लोकांना कॉल केल्याचे तपासात समोर आल्याने त्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.  या प्रकरणात जवळपास सर्व आरोपी अटक करण्यात आली आहे. पण चोरीला गेलेल्या सोन्याचं गौडबंगाल काही संपता संपत नाही. याच प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून एन्काऊंटर झालेला आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे.

Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर दरोड्यातील साडेपाच किलो सोन्याचं गुड कायम आहे. मात्र पोलिसांनी आता अमोलची बहिण रोहिणी खोतकरला बेड्या ठोकल्या आहेत. रोहिणीच्या घरातून पोलिसांना 220 ग्रॅम सोने आणि पिस्तूलची सात काडतूस  मिळाले आहे. हे सर्व सोने तुळशी वृंदावनात लपवल्याचेही समोर आले आहे. 

रोहिणीला गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी लावलेला असता ती 18 जूनला मोबाईल बंद करून गोव्याला निघून गेली होती. गोवा आणि कर्नाटक येथे वास्तव्यास असलेल्या तिचा मित्र रणजीतकडे  दागिने दिल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथक गोवा आणि कर्नाटक येथे तपासाला जाणार आहेत, दरम्यान आरोपी रोहिणीने नवीन सिमकार्ड घेतली आहे. तसेच तीन संशयास्पद लोकांना कॉल केल्याचे तपासात समोर आल्याने त्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत  17 आरोपी अटक केली आहे. आठ लाखांची रोख रक्कम, तीन चार चाकी वाहन, आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे. सोबतच 30 किलो चांदी आणि 574 ग्रॅम सोन जप्त केलं आहे. मात्र उरलेल्या सोन्याचा शोध अद्याप लागलेला नाही. 

Advertisement

Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट