Chhatrapati Sambhajinagar Crime : ठाणे जिल्ह्यातील बदलापुरमधील एका नामांकित शाळेत चौथीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने अख्खा महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. विद्येची देवता जिथं वास करते अशा शाळेमध्ये मुलगी असुरक्षित असल्याचं समोर आल्याने पालकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान काल 5 ऑगस्ट रोजी ठाण्यातून (Thane School) एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ठाणे जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीच्या पालकांनी एका अज्ञात व्यक्तिविरोधात मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
यानंतर छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका स्कूल बसच्या चालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात सापडली आहे.
नक्की वाचा - Latur News: अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध दिलं, दारुही पाजली, अत्याचार करतानाचा व्हिडीओ काढला, अन् पुढे...
'तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ,' असे म्हणत स्कूल बसचालकाने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. हा संतापजनक प्रकार कामगार चौक ते जय भवानीनगर मार्गावरील एका स्कूल बसमध्ये हा घडला. याप्रकरणी स्कूल बस चालक गणेश संपत म्हस्के याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. .