Chhattisgarh News : माओवाद्यांकडून पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट, दोन नागरिकांची हत्या 

गेल्या अनेक दिवसांपासून माओवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात असल्य़ाच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा छत्तीसगडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या अनेक दिवसांपासून माओवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात असल्य़ाच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा छत्तीसगडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. बिजापूरच्या पामेड पोलीस स्टेशन हद्दीतील यमपूर सँड्रा बोर गावात 21 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृतांमध्ये एका ग्रामस्थाचा आणि आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचा समावेश आहे. माओवाद्यांनी माजी माओवादी वेको देवा आणि ग्रामस्थ समय्या यांची हत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली अशी माहिती मिळाली आहे आणि त्याची पुष्टी करण्यासाठी पोलीस विभागातर्फे पडताळणी केली जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - Beed Crime : मुलगा जिवंत हवा असेल तर 50 हजार टाका, अन्यथा... बीडमधील धक्कादायक प्रकार

वनरक्षकांना नक्षलवाद्यांकडून पत्रकातून गंभीर इशारा...

छत्तीसगडमधील कोंटा ब्लॉकच्या कोंटा, गोलापल्ली, किस्ताराम, चिंतागुफा, पोलामपल्ली, दोर्नापाल, एराबोर, भेज्जी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भागात काम करणाऱ्या वनरक्षकांना आणि पटवारींना नक्षलवाद्यांकडून पत्रकाच्या माध्यमातून गंभीर इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. वनरक्षक आणि पटवारी यांच्या लूटमार आणि शोषणाविरुद्ध सार्वजनिक चळवळ आणि प्रतिकार तीव्र करा असे नक्षल्यांकडून सर्वसामान्यांना आवाहन करण्यात आले आहे.

तलाठी 40 वर्षांपासून बंद असलेले कर्ज वसूल करण्यासाठी गावोगावी फिरत आहे आणि नवीन पट्टा बनवण्याच्या नावाखाली पैसे लुटत आहेत. आणि वनरक्षकाने ग्रामसभेच्या परवानगीशिवाय बांबू आणि जंगले तोडण्याची आणि त्यांची वाहतूक करण्याचे काम सुरू केले. तो एखाद्याच्या जमिनी आणि जंगलांना सरकारी जमीन म्हणून संबोधून त्यांना धमकावत आहे. एकंदरीत, आदिवासी स्थानिकांकडून शिक्षा म्हणून पैसे, दारू, कोंबडी, बकरी आणि डुक्कर यांचीही मागणी करत आहेत. असे पत्रक काढण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सुकमा जिल्ह्याच्या  कोन्टा एरिया कमेटीचा सचिव मंगडूच्या जागी दुल्ला याला नक्षल्यांनी पदभार दिला आहे. पहिल्यांदाच दुल्ला याच्या नावाने हे पत्र काढण्यात आले आहे. 

Topics mentioned in this article