मोसिन शेख, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा 24 एप्रिल 2024 रोजी मृत्यू झाला. त्यानंतरही तब्बल 11 दिवस डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा सर्व धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदान्त बाल रुग्णालयात घडला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस बालकाचा जीव गेला आहे. रुग्णालयात हसत खेळत आलेल्या दैविकच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
नक्की वाचा - ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, विस्तार अधिकाऱ्याला धु..धु.. धुतलं
या प्रकरणात घाटीतील उच्चस्तरीय समितीने अहवाल सादरकेला आहे. त्यानुसार रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळ, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आमि डॉ. नितीन अधाने यांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या साडे पाच वर्षांच्या दैविकला 20 एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी आणले होतं. तेव्हा डॉ. अर्जुन पवार यांनी बाळाला फायमोसीस विथ पिनाईल टॉर्नन हा आजार झाल्याचं सांगितलं होतं. यासाठी छोटसं ऑपरेशन करावं लागेल असंही सूचवलं होतं. त्यानुसार 25 एप्रिल रोजी बाळाला ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
25 एप्रिल रोजी बाळाला ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल केले होते. 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता दैविकला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. साधारण 7.15 वाजता डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहम्मद इलियास आले. सुरुवातील डॉक्टरांनी 20 ते 25 मिनिटात ऑपरेशन होईल असं सांगितलं होतं. मात्र 45 मिनिटं झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. शेवटी तासाभराने डॉ. पवार ओटीमधून बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन चांगलं झाल्याचं सांगितलं. डॉ. इलियास यांनी बाळाला स्पाईनमध्ये भूल दिली होती. परंतू बाळाने मध्येच हात हलविल्यामुळे त्याला परत झोपेचं इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे बाळ सध्या बेशुद्ध आहे. थोड्या वेळाने शुद्धीवर येईल असं सांगितलं आणि निघून गेले.
मात्र त्यानंतर दैविक कधीच शुद्धीवर आले नाही. साधारण 6 मेपर्यंत त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 6 मे रोजी दुपारी 3.30 वाजता त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नक्की वाचा - मामानेच मुलीची हत्या करून लावली मृतदेहाची विल्हेवाट, उल्हासनगरमधील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?
तो शेवटपर्यंत शुद्धीवर आलाच नाही.
दवाखान्यातील सर्व डॉक्टर आणि नर्स यांनी काही वेळापूर्वी त्याने डोळे उघडले होते, हातपाय हलवले होते, आता तो झोपलेला आहे', अशी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अहवालात नेमकं काय?
दैविकला ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी 'स्पाईनल मध्ये भूल दिली होती. मात्र ऑपरेशन सुरू असताना बाळाने हात हलवल्यानंतर डॉ. शेख इलियास यांनी बाळाला झोपेचे इंजेक्शन दिले. सीसीटीव्हीत तो तीन इंजेक्शन देताना दिसत आहे. ते तीन इंजेक्शन नेमके कशाचे? याचा उल्लेख उपचाराच्या कागदपत्रांमध्ये नाही, असे उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले आहे.