पोलिसांची मोठी कारवाई, गोदिंयामध्ये उधळून लावला बालविवाह

Gondia Child Marriage Stopped: बालविवाहाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि अल्पवयीन मुलीचा विवाह होण्यापासून रोखले.

Advertisement
Read Time: 2 mins

- रवी आर्य, गोंदिया

Gondia Child Marriage Stopped: राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये कायद्याचे उल्लंघन करून आजही बालविवाह रचले जात आहेत. बालविवाह प्रथेसंदर्भात सरकार व प्रशासनातर्फे वारंवार जगजागृती केली जात असतानाही लोक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या लाडक्या लेकीच्या माथ्यावर संसाराचे ओझे लादताना दिसतात. गोदिंया जिल्ह्यामध्येही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांचे दामिनी पथक घटनास्थळी दाखल

शासन आणि प्रशासनाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये अजूनही जनजागृतीचा अभाव दिसत आहे. त्यामुळेचे अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे वृत्त सातत्याने ऐकायला मिळते. 28 एप्रिल 2024 रोजी गोंदियातील एका गावामध्ये पोलिसांनी बालविवाह उधळून लावला. इयत्ता नववी उत्तीर्ण झालेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी समजली. ही माहिती मिळताच पोलिसांचे दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बालविवाह रोखला. 

(नक्की वाचा: पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव)

घटनास्थळी नेमके काय घडले?

पोलिसांनी सर्व प्रयत्न करून तसेच कुटुंबीयांना समज दिल्यानंतरही ते आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यावर ठाम होते. यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाने मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली, याद्वारे मुलगी इयत्ता नववी उत्तीर्ण असल्याचा पुरावा पोलिसांना सापडला. पोलीस पथकाने दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह कायद्याच्या कलमांबाबतची सविस्तर माहिती दिली. या घडामोडींदरम्यान पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले. मुलाकडील कुटुंबातील सदस्यांशी फोनवरून संपर्क साधून लग्नाची मिरवणूक थांबवली गेली. दोन्ही कुटुंबीयांना सल्ले देऊन मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला.  

नक्की वाचा: सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये)

बालविवाह रोखण्यासाठी उपक्रम 

बालविवाह रोखण्यासाठी आणइ यासंदर्भातील उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक वर्मा, अतिरिक्त पोलीस निरीक्षक मट्टामी, दामिनी पथक महिला पोलीस उपनिरीक्षक भावना राऊत यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

Advertisement

VIDEO: भाजपविरोधात अरविंद सावंत आक्रमक, NDTV Marathiवर EXCLUSIVE मुलाखत

Topics mentioned in this article