लहान मुलांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सीबीआयनं दिल्लीत आणि हरियाणात केलेल्या कारवाई या टोळीला गजाआड करण्यात यश आलं आहे. सीबीआयनं या प्रकरणी सात ठिकाणी छापा टाकला होता. त्यावेळी ३ बाळांना विकण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांना अटक करण्यात आली. या मुलांना विकताना त्यांची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
सीबीआयने दिल्लीच्या केशवपुरम भागात एका घरावर छापा टाकला. तिथं दोन लहान मुलं आढळून आली. या दोन लहान मुलांनी विकण्याच्या तयारीत एक महिल होती. पुजा असं या महिलेचं नाव आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सात महिन्यापासून ती या घरात राहत होती. विशेष म्हणजे ती काय करते याचा पत्ता तिच्या शेजारच्यांना ही नव्हता. ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या दाम्पत्यांना मुलं नाही अशा बरोबर संपर्कात होती.
हेही वाचा - लोकसभा निवडणुकांमध्ये गोंधळ घालण्याचा चीनचा प्लॅन!
दिल्ली शिवाय सीबीआयनं हरिणातही छापेमारी केली आहे. तिथेही त्यांना एक लहान मुल सापडलं आहे. मुलं विकणाऱ्यांचीही टोळी होती. हरियाणातून ६ जण तर दिल्लीतून एक असे सात जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यात एका वार्ड बॉयचाही समावेश आहे. हे सर्व आरोपी वॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातल्या अशा लोकांच्या संपर्कात होते ज्यांना मुलं नाहीत. अशी जोडपी मुलांना दत्तक घेण्यास तयार होती. अशा जोडप्यांना मुलं देण्यासाठी ही टोळी ज्यांना मुलं आहेत अशा जोडप्यांबरोबर व्यवहार करत होते. शिवाय सरोगेट मातांकडूनही मुलांची खरेदी करत. नंतर ही मुलं ते गरजवंत जोडप्याना विकली जात होती. एका लहान मुलाची किंमत तब्बल पाच ते सहा लाख आकारली जात होती. तेवढे पैसे गरजवंत जोडप्याकडून वसूल केले जात होते.
हेही वाचा- 2 खासदारांपासून संपूर्ण बहुमत मिळवण्यापर्यंतच पल्ला भाजपने कसा गाठला
बाळाची विक्री करताना संबधीत जोडप्याना खोटी कागदपत्रही दिली जात होती. या प्रकरणात एका असिस्टंट लेबर कमिश्नरची ही चौकशी केली जात आहे. तोही या रॅकेटचा भाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. सर्व आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले गेले आहेत. या प्रकरणात काही आईव्हीएफ सेंटर आणि काही हॉस्पिटलचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान या छापेमारी दरम्यान सीबीआयने 5 लाख रुपये आणि काही कागदपत्रही जप्त केली आहेत.