जाहिरात
Story ProgressBack

2 खासदारांपासून संपूर्ण बहुमत मिळवण्यापर्यंतच पल्ला भाजपने कसा गाठला, वाचा सविस्तर

भाजपचा 6 एप्रिल हा स्थापना दिवस आहे. यंदाचा भाजपचा 45 वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 साली भाजपची स्थापना झाली होती. 1984 साली भाजपचे 2 खासदार होते 2014 साली भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. 2019 च्या निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजने इतिहास रचला होता.

Read Time: 3 min

भाजपचा स्थापना दिन (संग्रहीत फोटो)

नवी दिल:
  • भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी (भाजप स्थापना दिन) मुंबईत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी केली होती. 1930 साली 6 एप्रिल रोजीच महात्मा गांधींनी दांडी यात्रेनंतर मिठाचा काळा कायदा मोडला होता. भारतीयांना समुद्रातून मीठ तयार करण्याचा पूर्ण अधिकार असून त्याला पायबंद घालण्याचा कोणताही अधिकार ब्रिटिश सरकारला नाही असे म्हणत महात्मा गांधींनी हा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला होता. या ऐतिहासिक दिनाच्या दिवशीच पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
  • भाजप अस्तित्वात येण्यापूर्वी जनसंघ नावाचा पक्ष होता. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर वाजपेयी आणि अडवाणी यांनी जनसंघाचे अध्यक्षपद सांभाळले होते. 1977 मध्ये भारतीय जनसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले जनसंघ, जनता पक्षात विलीन झाला.
  • जनता पक्षातील अंतर्गत भांडणामुळे 1977 मध्ये मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. यानंतर  जनसंघाच्या नेत्यांना वाटले की त्यांनी नवीन व्यासपीठ तयार केले पाहिजे. यामुळे भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.  1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली ज्यामुळे काँग्रेसने 400 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपला केवळ २ जागा मिळाल्या होत्या. 
  • 1984 मध्ये गुजरातमधील मेहसाणा येथून ए.के.पटेल आणि आंध्र प्रदेशातील हमानाकोंडा येथून पांडूभाई पटिया जांगारेड्डी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकले होते.  1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नशीब असे पालटले की अवघ्या 2 जागा असलेल्या भाजपला 85 जागा जिंकण्यात यश आले. तेव्हापासून भाजपचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा वाढण्यास सुरुवात झाली. 1991 मध्ये भाजपने 120 जागा जिंकल्या होत्या. 1996 मध्ये 161 जागा जिंकून भाजप संसदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्या काळात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र बहुमताअभावी त्यांना अवघ्या 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला होता.
  • यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपने इतर पक्षांशी युती केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची स्थापना झाली. भाजपने या निवडणुकीत 182 जागा जिंकल्या आणि अटलबहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मात्र त्यांचे सरकार बहुमताअभावी 13 महिन्यांनी कोसळले. 1999 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा विजय मिळवला आणि रा.लो.आ.ने 303 जागा जिंकल्या. यावेळी वाजपेयी यांच्या सरकारने ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 
  • 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 138 जागा जिंकल्या होत्या. तर 2009 मध्ये पक्षाला 116 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 283 जागा जिंकून इतिहास रचला होता. भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले.  2019 मध्ये भाजपने 300 हून अधिक जागा जिंकून इतिहास रचला. या निवडणुकीत एनडीएने 350 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 तर एनडीएने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह प्रमुख नेत्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. 
  • 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा दावा काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. मात्र, 370 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य त्यांच्यासाठी थोडे कठीण ठरू शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्याचेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाजपने 2019 साली ज्या राज्यांमध्ये सर्व जागा जिंकल्या होत्या त्या राज्यांमध्ये क्लीन स्वीपची पुनरावृत्ती करावी लागेल तरच हे लक्ष्य साध्य होऊ शकते 
  • भाजपचे 19 हजार कार्यकर्ते 40 लाखांहून अधित मतदारांपर्यंत वैयक्तिक संपर्क निर्माण करत त्यांच्या पक्षाला विजय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. 
  • Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination