जाहिरात
Story ProgressBack

लोकसभा निवडणुकांमध्ये गोंधळ घालण्याचा चीनचा प्लॅन! Microsoft चा गंभीर इशारा

Read Time: 2 min
लोकसभा निवडणुकांमध्ये गोंधळ घालण्याचा चीनचा प्लॅन! Microsoft चा गंभीर इशारा
तैवानमधील निवडणुकांच्या दरम्यान चीनचा पाठिंबा असलेले सायबर ग्रुप सक्रीय होते, असं मायक्रोसॉफ्टनं म्हंटलंय.
मुंबई:


Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. देशात 19 ए्प्रिलपासून सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून 4 जूनला निकाल जाहीर होतील. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? मोदींची हॅट्ट्रिक रोखण्यात विरोधक यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तर 4 जून रोजी मिळणार आहेत. भारतीय मतदार कुणाला कौल देणार याची सर्व जगाला उत्सुकता असतानाच या निकालांवर प्रभाव टाकण्याचा चीन प्रयत्न करत आहे. 'मायक्रोसॉफ्ट' या बड्या टेक्नॉलजी कंपनीनं हा गंभीर इशारा दिलाय.

निवडणुकांच्या वर्षात China Virus

2024 मध्ये साधारण 64 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया यासारख्या बड्या देशांचा समावेश आहे. या तीन देशांच्या निवडणुकांवर चीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial  Intelligence) जनरेटेड कंटेटचा उपयोग करुन प्रभाव टाकू शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टनं दिलाय.

तैवानमधील अध्यक्षीय निवडणुकींच्या निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी चीननं एआयच्या मदतीनं प्रयत्न केला होता. मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजन्स टीम (threat intelligence team) नुसार चीनचा पाठिंबा असलेल्या सायबर ग्रुप उत्तर कोरियाच्या मदतीनं 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांना लक्ष्य करु शकते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी चीन सोशल मीडियाच्या मार्फत एआय सामग्रीचा प्रयोग करु शकतो. आपल्या हिताच्या अनुकूल जनमत निर्माण करण्यासाठी चीन हा प्रयत्न करत आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. 

'यावर्षी जगभरातील प्रमुख देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. आमच्या अंदाजानुसार भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये स्वत:च्या हिताची जपणूक करण्यासाठी चीन एआयचा वापर करेल,' असं मायक्रोसॉफ्टनं म्हंटलंय. 

AI चा निवडणुकांना धोका

मायक्रोसॉफ्टनं पुढं म्हंटलं आहे की, '

तैवानमधील निवडणुकांच्या दरम्यान स्टॉर्म 1376 हा चीनचा पाठिंबा असलेला ग्रुप विशेष सक्रीय होता. या समुहाच्या माध्यमातून नकली ऑडिओ, मीम्सह वेगवेगळे प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते. काही उमेदवारांची बदनामी करणे आणि मतदारांना प्रभावित करणे हा त्यांचा उद्देश होता. 

एआयचा वापर करुन खोटे साहित्य तयार केले जाऊ शकते. 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर काही सेलिब्रेटिंना बदनाम करण्यासाठी करण्यात आल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच उघड झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव वाढलेल्या या जगाचा एआयच्या माध्यमातून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, हे  स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टनं चीनबाबत दिलेला हा इशारा अधिक गंभीर आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination