गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट देण्यासाठी नववीतील मुलाने आईला दिला धोका; घरी गेला, कपाट उघडलं अन्...

अल्पवयीन मुलाच्या आईने या प्रकरणात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

मैत्रिणीच्या वाढदिवसाला पार्टी देण्यासाठी एका नववीतील तरुणाने स्वत:च्या आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकच नाही मैत्रिणीला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी त्याने स्वत:च्याच घरात चोर केली. दक्षिण-पश्चिम दिल्लीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी (Delhi Crime News) बुधवारी एका अल्पवयीन मुलाला अटक केली.

अल्पवयीन मुलाच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात चोरी केल्याचा एफआयआर दाखल केला होता. यानंतर ही घटना उघडकीस आली. तपासादरम्यान, महिलेचा मुलगा जो इयत्ता 9वीत शिकतो, तोच या प्रकरणात दोषी असल्याचं पोलिसांच्या समोर आलं. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या आईची सोन्याची अंगठी, कानातले, सोनसाखळी काकरोला परिसरातील दोन वेगवेगळ्या सोनारांना विकली. त्याने या पैशांचा वापर आपल्या मैत्रिणीला आयफोन आणि पार्टी देण्यासाठी केला. या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कमल वर्मा (40 वर्षे) नावाच्या सोनाराला अटक केली असून त्याच्याकडून एक सोन्याची अंगठी आणि कानातले जप्त केले आहेत.

नक्की वाचा - बुलढाण्यात गुप्तधनासाठी 14 वर्षीय मुलाचा नरबळी? स्मशानात आढळल्या धक्कादायक गोष्टी

3 ऑगस्ट रोजी एका महिलेने घरफोडी केल्याच्या घटनेअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. ज्यात त्यांनी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरातून दोन सोन्याच्या चेन, एक जोड सोन्याचे झुमके आणि एक सोन्याची अंगठी चोरल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये तक्रारदाराच्या घराजवळ कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्या नाहीत.

Advertisement

गुन्हेगारीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, परंतु घटनेच्या वेळी तक्रारदाराच्या घराजवळ कोणतीही संशयास्पद गतिविधी आढळून आल्या नाही. पोलिसांनी या प्रकरणात शेजाऱ्यांची चौकशी केली. मात्र त्यांनाही काही संशयास्पद आढळून आलं नाही. शेवटी पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला