पुण्यातील नगरसेवकही होता निशाण्यावर, शिवकुमारच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

बाबा सिद्दींकींसह पुण्यातील एक नगरसेवक आरोपींच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddiqui Murder Case) आरोपी शिवकुमार गौतमने आणखी एक खुलासा केला आहे. बाबा सिद्दींकींसह पुण्यातील एक नगरसेवक आरोपींच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे.  पुण्यातील एक नगरसेवकही यांच्या निशाण्यावर होता. गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी शिवकुमारने असंही सांगितलं की, शुभम लोणकर याने त्याला पुण्यातील एका नगरसेवकाला मारायचं असल्याचं अनेकदा सांगितलं. 

नक्की वाचा - बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याला पाहिलं का? घटनास्थळावरच शिवकुमारला पोलिसांनी हटकलं होतं

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणे यांनी पुण्यात कोणत्या नगरसेवकाची हत्या करायची आहे हे कधीच सांगितले नाही. पण कोणत्या नगरसेवकाची हत्या करायची आहे आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या नगरसेवकाची हत्या करायची आहे हे त्यांनी कधीच सांगितलं नाही. याप्रकरणी पुणे पोलिसांना आवश्यक ती कारवाई करता यावी यासाठी मुंबई गुन्हे शाखेने ही माहिती पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलीस आणि शूटर शिवकुमार आमनेसामने आले होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

क्राइम ब्रँचच्या चौकशीदरम्यान शिवकुमार गौतमने सांगितलं की, हत्येनंतर लगेचच एका पोलिसाने त्याला विचारले की, कुणाला पळताना पाहिलं आहे का? क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकीवर गोळी झाडल्यानंतर शिवुमार गौतमने आधी कपडे बदलले आणि त्यानंतर तो घटनास्थळी परतला. शिवकुमार घटनास्थळी परतला. घटनास्थळावर उभ्या असलेल्या अनेकांची पोलीस चौकशी करीत होते. बघ्यांपैकी कोणी संशयितांना  पळताना पाहिलं आहे का? यावेळी पोलिसांनी आरोपी शिवकुमार यालाही प्रश्न विचारला होता. मात्र शिवकुमारने कोणालाही पाहिलं नसल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस पुढे सरसावले आणि इतरांची विचारपूस करू लागले.