Shocking News : पुण्याहून परभणीला निघालेलं युगुल; अचानक नवजात बाळाला धावत्या बसमधून दिलं फेकून, प्रवासी हादरले!

19 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षे मुलाने नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

परणभीतून (Parbhani Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका युगुलाने आपल्या नवजात बाळाता धावत्या बसमधून फेकून दिल्याचं समोर आलं आहे. पुण्याहून परभणीदरम्यान ही भीषण घटना उघडकीस आली आहे. महिलेने हा प्रकार पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. तिने तातडीने हा प्रकार उघडकीस केला. 

19 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षे मुलाने नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्याहून परभणीकडे येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्समधून हे दोघेजण प्रवास करत होते. त्यादरम्यान त्यांनी हा प्रकार पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात आल्यावर केला आहे.

नक्की वाचा - Nalasopara Video : वाहतूक पोलिसाला मारहाण करणं पडलं महागात, बाप-लेकासह साथीदाराला अटक; आज कोर्टात हजर करणार

संबंधित तरुण आणि तरुणी आंतरजातीय प्रेम संबंधांमधून एकत्र राहत होते. त्यातून या बाळाचा जन्म झाल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती ट्रॅव्हल्समधील एका महिलेने पोलिसांना फोनद्वारे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी देखील त्वरित पाऊल उचलत ट्रॅव्हल्स गाडीचा पाठलाग करून परभणी येथून या दोघांना ताब्यात घेतले आहे. संबंधित युवतीला पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तरुणाला  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाही पोलीस करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article