तरुणीची हत्या करुन जाळल्याची घटना दिल्लीतून समोर आली होती. कोणताही पुरावा नसताना आरोपीपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. गाझीपूरमध्ये झालेल्या या हत्याकाडांचा आरोपी तरुणीचा चुलत भाऊच असल्याचं समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाऊ अमित तिवारी आणि त्याचा मित्र अनुज यांना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी शिल्पा पांडे मागील एक वर्षापासून चुलत भाऊ अमित तिवारीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. शिल्पा अमितवर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र अमित लग्नाला तयार नव्हता. या सगळ्यातून त्याला सुटका करुन घ्यायची होती. याच विषयावरुन अमित आणि शिल्पाचं 25 जानेवारीला कडाक्याचं भांडण झालं. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अमितने शिल्पाचा गळा आवळून तिचा जीव घेतला.
(नक्की वाचा- CIBIL स्कोअर चांगला ठेवा, अन्यथा लग्नाला मुलगी मिळणार नाही; काय आहे कारण?)
शिल्पाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अमितने कॅब चालक मित्र अनुज कुमारला मदतीसाठी बोलावलं. मृतदेहाची विल्हेवाट लागवण्यासाठी दोघांनी आधी परिसरात जागेचा शोध घेतला. गाझीपूर येथील पेट्रोल पंपावरून त्यांनी आधी 160 रुपयांचे डिझेल विकत घेतले. त्यानंतर घरी येऊन दोघांनी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि सुटकेस गाझीपूरमधील एका निर्जन ठिकाणी फेकून दिली. तिथेच सुटकेस पेटवून दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मृतदेह पूर्णपणे जळाला होता, त्यात काहीही शिल्लक नव्हते. या प्रकरणी गाझीपूर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली.
(नक्की वाचा- Saif Ali Khan Attack: लग्न मोडलं, नोकरी गेली; सैफ हल्ला प्रकरणानंतर तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त)
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक
पोलिसांना हत्येचा तपास करण्यासाठी कोणताही धागा मिळत नव्हता. एक जळालेली सुटकेस आणि जळालेला मृतदेह सापडला एवढंच पोलिसांना सापडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना उत्तर प्रदेशची नंबर प्लेट असलेली एक संशयास्पद कार दिसली. या कारच्या माध्यमातून पोलीस अमित तिवारीपर्यंत पोहोचले. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.