
परदेशी पर्यटक तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीसह तिच्या बरोबर असलेल्या एका स्थानिक तरुणीवर ही अत्याचार करण्यात आले.या दोघीं बरोबर अन्य तीन पर्यटक ही होते. त्यातला एक अमेरिकन नागरिक होता. तर एक मराठी तरुणी होता. एक तरुण हा ओडीशावरून आला होता. या तिघांनाही अत्याचार करणाऱ्या नराधमांनी जवळच असलेल्या कालव्यात फेकून दिले. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. ही घटना कर्नाटकातल्या हंम्पीमध्ये घडली आहे. शिवाय परदेशी पर्यटक भारतात सुरक्षित आहेत का असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हंम्पी जवळ जनापूर आहे. त्या ठिकाणी असलेल्या कालव्या शेजारी चार पर्यटक आणि एक स्थानिक महिला जेवणाचा कार्यक्रम करत होते. पर्यटकांमध्ये एक महिला ही इस्त्रायली होती. तर एक जण अमेरिकन होता. त्याचं नाव डेनियल पिटास असं आहे. तो 23 वर्षाचा आहे. तर अन्य दोन पर्यटक भारतीय होते. त्यात एक मराठी पंकज पाटील होता. तर दुसरा ओडीशाचा होता. त्यांच्या बरोबर एक स्थानिक तरुणी ही होती. या सर्वांची कालव्या शेजारी पार्टी सुरू होती.
ही घटना गुरूवारी रात्री 11 वाजता घडली. ज्यावेळी पार्टी सुरू होती त्यावेळी मोटरसायकल वरून तीन जण तिथे आले. त्यांनी पेट्रोल पंम्प कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर स्थानिक तरुणीने इथं पेट्रोलपंप नाही असं सांगितलं. त्यावर त्या तिघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तिथे असलेल्या तिघां पर्यटकांनी त्यांचा विरोध केला. हे पाहात त्या तिघांनाही त्यांनी वाहत्या कालव्यात फेकून दिले. त्यानंतर या नराधमांनी आळीपाळीने त्या इस्रायली तरुणीवर अत्याचार केले. नंतर त्या स्थानिक तरुणीला ही त्यांनी सोडले नाही.
अत्याचार केल्यानंतर त्या तिघांनी त्यांच्याकडे असलेले 9500 रुपये लुटले आणि तिथून पसार झाले. तर कालव्यात फेकलेल्या तिघां पैकी अमेरिकन असलेल्या डेनियल पिटास आणि मराठी पंकज पाटील याने पोहत काठ गाठत आपला जीव वाचवला. तर तिसरा पर्यटक जो ओडिशाचा होता त्याचा मात्र मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अग्निशमन दलाला मिळाला आहे. ज्या परदेशी तरूणीवर अत्याचार झाला ती 27 वर्षाची आहे. तर स्थानिक महिला ही 30 वर्षाची आहे.
या घटनेनंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाय पीडितांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील तर त्याचीही सुट देण्यात आली आहे. दरम्यान कर्नाटक पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार केली आहेत. हे आरोपी कन्नड आणि तेलुगू बोलणार होते. त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी अत्याचार करण्या बरोबरच या पर्यटकांना शिवीगाळ आणि मारहाणही केली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर परदेशी पर्यटक भारतात सुरक्षित आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यात मराठी तरुणाचा जीव वाचला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world