जाहिरात

Gadchiroli News : आई-बाबा परराज्यात मजुरी करायला; चौथीतील संस्कारने राहत्या घरात घेतला गळफास

एका शांत, निरागस बालकाचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला.

Gadchiroli News : आई-बाबा परराज्यात मजुरी करायला; चौथीतील संस्कारने राहत्या घरात घेतला गळफास

Gadchiroli News : आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय संस्कार विनोद कन्नाके या बालकाने रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेले आहेत. घरी कोणीही नसल्याने संस्कार एकटाच राहत होता अशी माहिती आहे. 

नक्की वाचा - Buldhana news : बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या मुलीला भीषण रक्तस्त्राव; परप्रांतीय मजुराचं घृणास्पद कृत्य उघड

निरागस बालकाचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत

रविवारी सायंकाळी  6.30  च्या सुमारास त्याने टोकाचं पाऊल उचललं. शाळेतून घरी परतल्यानंतर अशा कोणत्या विवंचनेने त्याला ग्रासले होते की त्याला मृत्यू जवळ करावासा वाटला, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. एका शांत, निरागस बालकाचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठवण्यात आले. पुढील तपास आरमोर पोलीस करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com