जाहिरात

Crime News: ट्रेनिंग वेळी प्रेम, लग्नानंतरही संबंध, सुंदर पोलिस महिलेने जे केलं ते...

या दरम्यान अनुज कश्यप यांचं लग्न झालं. अनुजची पत्नी दिल्लीत शिक्षण घेत होती. यूपीएससीची तयारी करत होती.

Crime News: ट्रेनिंग वेळी प्रेम, लग्नानंतरही संबंध, सुंदर पोलिस महिलेने जे केलं ते...

Inspector Anuj Kashyap Suicide Case:पोलीस अधिकारी  अनुज कश्यप यांच्या आत्महत्येचं प्रकरण वेगळचं वळण घेत आहे. प्रेम, विवाहबाह्य संबंध आणि मानसिक तणाव यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सहरसा येथील रहिवासी असलेले अनुज कश्यप, गया जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. 8 ऑगस्ट रोजी त्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. ते गया येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) आशीष भारती यांच्या मीडिया सेलचे प्रमुख होते. अनुज कश्यप यांच्या आत्महत्या प्रकरणात, एक महिला उपनिरीक्षक (SI) स्वीटी हिला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, स्वीटीने अनुजवर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं कबूल केलं आहे. पण त्या मागची स्टोरी सर्वांना हादरवून सोडणारी आहे. 

Latest and Breaking News on NDTV

त्या रात्री काय झालं? 

अनुज कश्यप यांची गणना एक हुशार आणि जबाबदार अधिकारी म्हणून केली जात होती. ते पोलीस कारवाईबद्दल नेहमी प्रेस रिलीज काढत असतं. ज्या रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, त्या रात्रीही त्यांनी रात्री 9.35 वाजता शेवटची प्रेस रिलीज काढली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्यांच्याच आत्महत्येची प्रेस रिलीज काढावी लागली. या प्रकरणात, मृताच्या वडीलांनी गया येथील बेलागंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एसआय स्वीटीवर गुन्हा दाखल केला. तिला अटक करून कारागृहात पाठवण्यात आलं आहे. चौकशीत स्वीटीने सांगितलं की, दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती लग्नासाठी दबाव टाकत होती. पण अनुज विवाहित असल्यामुळे तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता.

नक्की वाचा - Dharali Disaster: धराली गावातून आली चांगली बातमी, ते 26 बेपत्ता लोक सापडले, पण त्यांनी जे सांगितलं ते...

अनुज कश्यप यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की, स्वीटी कुमारी आपल्या मुलाला सतत त्रास देत होती. अनुज कश्यप यांचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं होतं.  त्यांची पत्नी दिल्लीमध्ये राहून यूपीएससीची तयारी करत आहे. स्वीटी अनुजवर पत्नीला घटस्फोट देण्यासाठी सतत दबाव टाकत होती. 2021 मध्ये अनुज कश्यप आणि स्वीटी कुमारी यांची पहिली पोस्टिंग इमामगंज पोलीस ठाण्यात झाली होती. इथेच त्यांची भेट झाली. कामाच्या निमित्ताने त्यांच्यात बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही ड्युटी संपल्यावर एकत्र फिरायला जात असत. रेस्टॉरंटमध्ये जेवणही करत असत. या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू झाल्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली. अनुज कश्यप यांची एसएसपी कार्यालयात मीडिया सेलचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तर स्वीटी कुमारी यांची बेलागंज पोलीस ठाण्यात बदली झाली.

लग्नानंतरही संबंध सुरूच

यादरम्यान अनुज कश्यप यांचं लग्न झालं. अनुजची पत्नी दिल्लीत शिक्षण घेत होती. यूपीएससीची तयारी करत होती. तर अनुज गया येथेच भाड्याच्या घरात राहत होते. लग्नामुळे अनुज आणि स्वीटीच्या नात्यात दुरावा आला होता. पण पत्नी दिल्लीत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं नातं जुळलं. स्वीटी वारंवार अनुजच्या घरी येत-जात होती. घटनेच्या रात्री स्वीटी कुमारी आणि अनुज कश्यप यांच्यात वाद सुरू होता. व्हिडिओ कॉलवर त्यांच्यात भांडण झालं. याच भांडणादरम्यान अनुज कश्यप यांनी व्हिडिओ कॉलवर स्वीटीसमोरच गळफास लावून आत्महत्या केली. व्हिडिओ कॉलवर अनुज यांना गळफास लावताना पाहून स्वीटी घाबरली आणि सकाळी 5 वाजताच बेलागंजहून 30 किलोमीटर दूर गया येथे पोहोचली. तिने अनुजच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडला नाही. त्यानंतर तिने घरमालकाला याची माहिती दिली. घरमालकाने पोलिसांना बोलावलं.

पोलिसांची पुढील कारवाई सुरू

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्वीटीला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. सायबर पोलीस ठाण्यात झालेल्या चौकशीत स्वीटीने दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं. पोलीस चौकशीतून हे समोर आलं की, स्वीटीने केलेल्या मानसिक त्रासामुळे आणि लग्नासाठी टाकलेल्या दबावामुळेच अनुज कश्यप यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरू केली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com