जाहिरात

Pune News: पुणे स्थानकातून तब्बल 3 कोटींचे बेडशीट, टॉवेल चोरले, रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांची हातसफाई

पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेतून गेल्या पाच वर्षांत 2 लाख 6 हजार 483 बेडरोल चोरीला गेले असून,याची किंमत जवळपास 3 कोटी रुपये इतकी आहे.यात बेडशीट चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Pune News: पुणे स्थानकातून तब्बल 3 कोटींचे बेडशीट, टॉवेल चोरले, रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांची हातसफाई
Pune Crime News Today

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Railway Station Robbery News : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन पांघरुण (बेडशीट),उशी (पिलो),टॉवेल उपलब्ध करून देते. मात्र काही प्रवासी आपला प्रवास संपण्यापूर्वी हा अंथरुण-पांघरुणाचा संच (बेडरोल) चोरी करत आहेत.पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेतून गेल्या पाच वर्षांत 2 लाख 6 हजार 483 बेडरोल चोरीला गेले असून,याची किंमत जवळपास 3 कोटी रुपये इतकी आहे.यात बेडशीट चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार,पुणे स्थानकातून दररोज जवळपास 30 रेल्वे गाड्यांना बेडरोल किटचा पुरवठा होतो.यात चादरी,टॉवेल,बेडशीट,उशी आणि फेस टॉवेल यांचा समावेश आहे.प्रवासा दरम्यान वापरण्यासाठी दिले जाणारे हे साहित्य प्रवासी आपल्या साहित्यसोबत घरी घेऊन जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यात थेट रेल्वेचे आर्थिक नुकसान होत नाही.तर रेल्वे संबंधित ठेकेदाराकडून या रकमेची वसुली करते,तर ठेकेदार त्या डब्यातील कर्मचाऱ्यांकडून चोरीला गेलेल्या साहित्याच्या बदल्यात त्या रकमेची वसुली करतो. प्रवाशांच्या या चोरीच्या प्रवृत्तीचा फटका सामान्य कर्मचाऱ्यांना बसतो.

ठेकेदाराच्या बिलातून कपात

रेल्वे नियमानुसार,एसी डब्यात प्रवाशांना बेडरोल पुरवणे आणि प्रवाशाचे निश्‍चित स्थानक येण्यापूर्वी अर्धा तास आधी ते साहित्य पुन्हा जमा करून घेणे ही सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांची असते.अनेकदा रात्री-अपरात्री येणाऱ्या स्थानकांवर घाईगडबडीत प्रवासी उतरतात,तेव्हा काही प्रवासी टॉवेल किंवा बेडशीटसोबत घेऊन जातात. गाडी जेव्हा अंतिम स्थानकावर पोहोचते,तेव्हा जमा झालेल्या साहित्याची मोजणी होते.या मोजणीत जेवढ्या वस्तू कमी भरतात,त्याचे एकूण बाजारमूल्य निश्चित करून ती रक्कम थेट ठेकेदाराच्या बिलातून किंवा अनामत रकमेतून कापली जाते.

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशाची फसवणूक, 'ते' तिकिट दिलं चक्क 510 रुपयांना, नेमकं काय घडलं?

प्रवाशांना बेडरोल पुरवण्याची आणि ते सुरक्षित जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी खासगी ठेकेदाराची असते.पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत जे साहित्य गहाळ झाले.त्याचे ऑडिट करून तब्बल 2.81 कोटी रुपयांची भरपाई ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली आहे.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रवाशांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे,अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेली आहे.

प्रवाशांना स्वच्छ बेडरोल पुरवण्याचे काम खासगी ठेकेदारांमार्फत केले जाते.नियमानुसार, प्रवाशांना दिलेले साहित्य गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारावर निश्चित केली आहे.पुणे रेल्वे विभागात गेल्या पाच वर्षांत गहाळ झालेल्या या सर्व साहित्याची एकूण किंमत तब्बल 2 कोटी 81 लाख 76 हजार 89 रुपये इतकी निश्चित करण्यात आली.रेल्वेने आपले नुकसान टाळत ही संपूर्ण रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली आहे.

पाच वर्षांत इतक्या वस्तूंची झाली चोरी

  • चादरी- 63549 
  • उशीचे कव्हर - 59063
  • फेस टॉवेल- 57202
  • ब्लँकेट - 15043 
  • उशी - 11626 
संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com