इंस्टाग्रामवर मैत्री होते. त्या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात होते या आणि या सारख्या अनेक बातम्या आपण पाहील्या असतील. पण एका परदेशी तरुणी बरोबर इंस्टाग्रामवर मैत्री झाली. ही तरुणी इंग्लंडमध्ये राहात होती. ही मैत्री इतकी घट्टा होती की त्या तरुणीने इंग्लंडवरून थेट भारतात आपल्या मित्राला भेटण्याचे ठरवले. तसं तीने केलं ही. पण ज्यावेळी ती दिल्लीत आली, त्यानंतर तीच्या बरोबर जे काही घडलं त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. शिवाय ती तरुणी ही सध्या शॉकमध्ये आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ब्रिटीश तरुणीची दिल्लीतल्या कैलाश नावाच्या एका तरुणा बरोबर इंस्टाग्रामवर मैत्री झाली. ते नेहमी इंस्टाग्रामवर बोलत असतं. विशेष म्हणजे जो तरुणी तीच्या संपर्कात आला होता तो अगदी लो प्रोफाईल होता. तो गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून तिच्या बरोबर बोलत होता. त्याच्या बोलण्याने ती प्रभावीत झाली होती. तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती आधी महाराष्ट्र आणि गोव्यात फिरण्यासाठी आली.
त्यावेळी तिने कैलाश बरोबर संपर्क केला. त्याला तीने गोव्याला बोलावले. पण आपण तिकडे येवू शकत नाही. तू दिल्ली ये असं त्याने तीला सांगितले. ब्रिटीश तरूणी दिल्लीला येण्यासाठी तयार झाली. दिल्लीतल्या महिपालपूर ठिकाणी असलेल्या एक हॉटेलमध्ये ती थांबली. त्यानंतर तीने कैलाशला फोन केला. त्याला हॉटेलवर भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर कैलाश आपला मित्र वसीमला घेवून तिच्या हॉटेलवर गेला.
त्यानंतर तिघांनी मिळून तिथे पार्टी केली. दारुचे सेवन केले. त्यानंतर त्या दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना मंगळवारी झाली. त्यानंतर ब्रिटीश तरुणीने याबाबत बुधवारी तक्रा दिली. त्यानंतर पोलीसांनी तातडीने वसंतकुंज इथं राहाणाऱ्या या दोन आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती ब्रिटीश हायकमीशनला ही देण्यात आली आहे. पीडित तरुणी ही लंडनची राहाणारी आहे. ज्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला ते लो प्रोफाईल असल्याचे पोलीसांनी सांगितले. शिवाय ते तिच्या बरोबर बोलताना गुगल ट्रान्सलेटचा वापर करत होते असंही पोलीसांनी सांगितलं आहे.