
मनोज सातवी, विरार: नुकत्याच बारावीच्या परीक्षा पार पडल्या. परीक्षेचे टेन्शन गेल्याने विद्यार्थी निर्धास्त झालेत. पण काही महिन्यांतच लागणाऱ्या निकालाचेही टेन्शन आहेच की... दुसरीकडे शिक्षकांचीही बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीची लगबग सुरु आहे. अशातच विरारमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर लागले आहे.
विरारमधील पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट आगाशी परिसरात ही घटना घडली. शिक्षिकेने 12 वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणली होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झाले आहे.
(नक्की वाचा - Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)
धक्कादायक बाब म्हणजे, बारावीच्याउत्तर पत्रिका कॉलेजमध्येच तपासणे बंधनकारक असताना शिक्षिकेने नियम तोडून त्या घरी कशा नेल्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पेपर तपासणीसाठी घरी कसे आणले? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world