जाहिरात

Panvel News: 29 व्या मजल्यावरून 8 वर्षाच्या लेकीला फेकले, अन् आईने ही पुढे भयंकर पाऊल उचलले

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Panvel News: 29 व्या मजल्यावरून 8 वर्षाच्या लेकीला फेकले, अन् आईने ही पुढे भयंकर पाऊल उचलले
पनवेल:

प्रथमेश गडकरी

होळीचा सण सगळीकडे साजरा केला जात असताना पनवेलमध्ये मात्र रक्ताची होळी पाहायला मिळाली. इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईनेच आपल्या 8 वर्षाच्या लेकीला संपवलं आहे. तिचं येवढ्यावरच भागलं नाही. त्यानंतर तिने स्वत:चं जिवन ही संपवलं आहे. होळीच्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. पनवेल पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले. त्यानंतर त्यांनी हत्या आणि त्यानंतर झालेल्या आत्महत्या या मागचं कारण शोधण्यास सुरूवात केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पनवेलमध्ये बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मॅरेथॉन नॅक्सॉन इमारतीत एका आईने आपल्या आठ वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली ढकलून देत तिची हत्या केली. त्यानंतर तिने स्वतः ही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मैथिली दुवा असे या आईचे नाव असून, मायरा दुवा असे तिच्या आठ वर्षाच्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैथिली काही काळापासून मानसिक तणावाखाली होत्या. शिवाय पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. 

ट्रेंडिंग बातमी - Virar News: धक्कादायक! शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक; निकालाचं काय?

आशिष दुवा आणि मैथिली यांचा महाविद्यालयीन जीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी प्रेमविवाह केला होता. आशिष मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील राहाणारा होता. तो कंत्राटी व्यावसायिक आहे. तर मैथिली ही गृहिणी होती. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मैथिली यांनी आपल्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकले. त्यानंतर त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मैथिली यांनी स्वतः इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. 

ट्रेंडिंग बातमी - Ranya Rao : कपडे, बेल्ट, YouTube कर्नाटकच्या मोनानं कसं आणलं भारतामध्ये सोनं?

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास ही सुरू केला आहे. पोलिसांनी इमारतीमधील लोकांचे आणि घरातील लोकांचे जबाब नोंदवले आहेत. मैथिली यांच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मैथिली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.