मुलींवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. राज्यात कुठेना कुठे मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. काही अशा घटना समरो येत आहे त्यामुळे नात्यालाही कलंक लावला जात आहे. अशीच एक घटना कोल्हापूरातल्या शाहूवाडी घडली आहे. बाप लेकीच्या नात्याला कलंक लागेल अशी घटना समोर आली आहे. इथं बापानेच आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केले आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
शाहूवाडी तालुक्यातील एका गावात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एक व्यक्ती कुटुंबासोबत इथं राहात होता. त्याने एका महिले बरोबर लग्न केले होते. तिला एक मुलगी आणि मुलगा होता. त्याच सावत्र मुलीवर त्याने अत्याचार केले आहेत. ही मुलगी अल्पवयीन होती. ज्या वेळी मुलीची आई आणि भाऊ घरा बाहेर असायचे त्यावेळी तो त्या मुली बरोबर जवळीक करायचा. तिला धमकी ही द्यायचा.
त्यानंतर रात्रीच्या वेळी सर्व जण झोपल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करायचा. जर कुणाला सांगितलं तर तुला, तुझ्या आईला आणि भावाला ठार मारेन अशी धमकी द्यायचा. त्यामुळे ही मुलगी घाबरून गेली होती. होत असलेल्या गोष्टींची तिने कुठेही वाच्यता केली नाही. कुणाला तक्रारही केली नाही. त्यामुळे तिच्यावर सतत अत्याचार होत गेले आणि ती सहन करत गेली. येवढं सर्व घरात होत असल्याची पुसटती कल्पना त्या मुलीच्या आईला किंवा भावाला ही आली नाही.
मात्र हा त्रास असह्य झाल्यानंतर मात्र या मुलीने आईला झालेली घटना सांगितली. हे ऐकून तिच्या आईला धक्काच बसला. पण खरा धक्का त्यानंतर बसला. ज्या वेळी त्या मुलीची तपासणी करण्यात आली त्यावेळी ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. आई आणि भावाच्या पाया खालची वाळू घसरली. त्यांनी तातडीने पिडीत मुलीला शाहूवाडी पोलिस स्थानकात नेले. मुलीने झालेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली.
मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. शिवाय नराधम बापालाही पोस्को खाली ही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नराधम बाप आपल्यावर रात्रीच्या वेळी अत्याचार करत होता असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. बाप लेकीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय या नराधम बापाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी ही आता होत आहे.