Crime News: रॅपिडो चालकाचे अल्पवयीनवर अत्याचार, पण ती खचली नाही; ChatGPTच्या मदतीने नराधमला शोधलंच अन्...

Crime News: रॅपिडो चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय

जाहिरात
Read Time: 2 mins
"Crime News: रॅपिडो चालकाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार"
Canva

Crime News: मध्य प्रदेशातील इंदुर शहरात रॅपिडो चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या कठीण काळातही अवघ्या 17 वर्षांच्या पीडितेने कमालीची जिद्द दाखवत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नराधम आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. अत्याचार झाल्याच्या धक्क्यात असतानाही या मुलीने हार न मानता चॅटजीपीटीच्या (ChatGPT) मदतीने महिला गुन्हेगारीशी संबंधित हेल्पलाइन क्रमांक शोधले आणि नराधमाला गजाआड धाडलं. 

पीडित तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

याप्रकरणी पोलिसांनीही पटकन हालचाली करत अंकित नागर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने राजवाडा परिसरात जाण्यासाठी रॅपिडो अ‍ॅपवरून बाइक टॅक्सी बुक केली होती. राजगड जिल्ह्याचा रहिवासी असलेला आरोपी अंकित नागर हा इंदुरमध्ये पदवीचे शिक्षण घेतोय आणि स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाइम चालक म्हणून काम करत होता. पीडित मुलगी बाइकवर बसल्यानंतर आरोपीने तिला नियोजित ठिकाणी न नेता स्वस्त दरात कपडे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तिला विश्वासात घेऊन तो परदेशीपुरा या निर्जन भागात घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो पीडितेला एका मंदिराजवळ सोडून पसार झाला.

(नक्की वाचा: Nagpur News: नागपूर हादरलं! नात्यातीलच अल्पवयीन मुलांकडून मुलीवर सतत अत्याचार, 1098 क्रमांकामुळे काळं सत्य उघड)

पोलीस ठाण्याजवळ राहते पीडित मुलगी

प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पीडितेच्या जबाबात नोंदवलेल्या काही विधानांमुळेही शंका निर्माण झाल्या आहेत. पीडित मुलगी पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ राहते, तरीही तिने ताबडतोब पोलिसांशी किंवा तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही. शिवाय तिच्या मोबाइल फोनमधून रॅपिडो बुकिंगची हिस्ट्री हटवण्यात आलीय. या सर्व पैलूंची कसून चौकशी केली जात आहे."
 

Topics mentioned in this article