अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. इथं तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडक झाले आहेत. या प्रकरणात शिक्षकच नाही तर अन्या चार आरोपही सहभागी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चार जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी फरार आहे.
या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी नुसार 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पीडित मुलीवर शाळेच्या परिसरातच जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित चिमुकलीला दुपारच्या जेवणाच्या सुट्टी वेळी संजय फुंदे या नराधम शिक्षकाने वर्गात बोलावून घेतलं.
त्यानंतर तिच्यावर तो तिथेच अत्याचार करत होता. झालेली घटना मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिचे आई आणि वडील जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते. पण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. असं पीडित कुटुंबाने म्हणले आहे. संबंधित कुटुंबीय हे परप्रांतीय असल्याने स्थानिकांकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
दरम्यान याप्रकरणी संजय उत्तम फुंदे , आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान पठाण, उमर नियाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत स्थानिक पोलिसांना विचारले असता त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती असून इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.