व्यसन माणसाला काय करायला लावेल ते सांगता येत नाही. अनेक वेळा व्यसनापोटी टोकाची पावलं उचलली जातात. तर कोणी आपलं आयुष्य उद्धवस्त करून बसतात. अशी अनेक उदाहरणं समोर आहेत. असं असलं तरी व्यसनाच्या आहरी गेलेले अनेक जण त्यातून बाहेरच पडत नाही. तर काहींना त्यातून बाहेरच पडायचं नसतं अशी स्थिती असते. त्यातून त्यांच्या हातून भयंकर कृत घडतात. अशी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या वजनापूर इथं ही घटना घडली आहे. नवापूरमध्ये शेषराव चव्हाण आणि त्यांचा मुलगा नंदू चव्हाण राहातात. शेषराव चव्हाण यांचे वय जवळपास 80 वर्षाचे आहे. त्यांचा नंदू हा मुलगा असून तो 50 वर्षाचा आहे. नंदूला दारुचे व्यसन आहे. त्यामुळे त्याचे घरचेही त्याला कंटाळले आहे. दारुसाठी तो सतत घरच्यांकडून पैसे मागत असत. नेहमी त्याला पैसे देणे घरच्यांनाही शक्य नव्हते. त्यातून सतत वाद ही होत होते.
ट्रेंडिंग बातमी - Mumbra Contro: मुंब्र्यात मराठीचा आग्रह, जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर...
अशा स्थितीत त्यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजेच शेषराव चव्हाण यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. पण शेषराव यांनी नंदू याला दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. जोरात भांडणही झालं. त्याच वेळी नंदूने घरात असलेली लोखंडी खुर्ची हातात घेतली. त्या खुर्चीने वडीलांवर त्याने हल्ला केला. त्यात शेषराव यांच्या डोक्याला जबर जखम झाली. ते खाली कोसळले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पण त्यांना कोणीही वाचवलं नाही.
त्यातच शेषराव यांचा मृत्यू झाला. पोटच्या लेकानेच बापाचा दारूसाठी खून केला. खून केल्यानंतर नंदूने तिथून पळ काढला. याबाबत पोलिसांनी समजताच त्यांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक तयार केले. त्यानंतर दारूसाठी खून करणाऱ्या नंदूला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय केवळ दारूसाठी त्याने हा खून केला की त्या मागे आणखी काही कारण आहे याची चौकशीही पोलिस करत आहेत.