
उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. शहरात एक दाम्पत्य राहात होते. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर ही त्यांना मुल होत नव्हतं. अशा वेळी पत्नीनेच आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला आपल्या पती बरोबर शरिरसंबध ठेवण्यास दबाव टाकला. शिवाय मुल झाल्यास जमीन देण्याचे अमिष ही दाखवले. त्यानंतर जो काही घटनाक्रम झाला त्याने पोलीस ही हादरून गेले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर एक उच्च शिक्षित जोडपं असं काही करु शकतं यावर कुणाचा विश्वास बसायला तयार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बृजपाल सिंह हा व्यक्ती आपल्या पत्नी सोनिया बरोबर शाहुपूर भागात राहात होता. सोनिया हिला लग्नानंतर बरीच वर्ष मुल होत नव्हतं. शेवटी त्यावर तिने उपाय शोधून काढला. घरात घरकाम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीला तिने जमीन आणि फ्लॅटचे अमिष दाखवले. त्या बदल्यात पती बरोबर शरिरसंबध ठेव. त्यातून आम्हाला एक बाळ दे अशी अट तिच्या समोर ठेवण्यात आली. हे ऐकून त्या मोलकरणीच्या पायाखालची वाळू सरकली. तीने या गोष्टीसाठी साफ शब्दात नकार दिला. तिचा नका ऐकून या दाम्पत्याने तर कहरच केलं.
पीडीत मोलकरीण ही कुशीनगरची रहिवाशी आहे. तिने याबाबत तक्रार देताना धक्कादायक माहित पोलिसांना दिली आहे. बृजपाल सिंह यांनी आपल्याला घरकामासाठी बोलावले होते. त्यासाठी 10 हजार रुपये महिन्याला देण्याचे ही मान्य केले. त्यानंतर बृजपाल यांच्या भाड्याच्या घरात ती ही राहू लागली. काही दिवसानी बृजपाल सिंह यांची पत्नी सोनिया हिने मला मुल होत नाही. त्यामुळे तू माझ्या पती बरोबर शरीरसंबध ठेव. आम्हाला एक बाळ दे. आम्ही तुला जमीन देवू असं सांगितलं. मात्र याला त्या मोलकरणीने स्पष्ट शब्दात नकार दिला.
ट्रेंडिंग बातमी - Nagpur Update: पेट्रोल बॉम्ब ते देव-देवतांचे विडंबन! नागपुरात काय घडलं? एकनाथ शिंदेंनी सर्वच सांगितलं
त्यानंतर एका रात्री सोनिया ही दारूच्या नशेत त्या मोलकरणीच्या खोलीत घुसली. त्यानंतर तिला जीवे मारणयाची धमकी दिली. ऐवढेच नाही तर तिने पती बृजपाल सिंह याला आपल्यावर अत्याचार करायला लावले. तु आम्हाला बाळ दे, आम्ही अजमेरला तुला जमीन आणि फ्लॅट देवू असं पुन्हा एकदा सांगितलं. मात्र नकार दिल्यानंतर परत तिच्यावर तिच्या पतीने अत्याचार केले. शिवाय त्यावेळचा व्हिडीओ ही बनवला. असा आरोप पिडीतेने केला आहे.
त्या व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया आणि बृजपाल सिंह हे तिला ब्लॅकमेल करू लागले. शिवाय तिला त्याच घरात बरेच दिवस कैद करून ठेवण्यात आले. त्या कालावधीत बृजपाल सिंह याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पण एक दिवस तिने सर्वांची नजर चुकवत त्या घरातून पळ काढला. त्यानंतर ती थेट पोलिसांकडे गेले. जेव्हा ही गोष्ट पोलीसांना समजली त्यावेळी ते हादरून गेले. तोपर्यंत त्या दाम्पत्याने पळ काढला होता. ते आता फरार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी 10 हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world