नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ 'कॅप्टन'* याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला 'महाराष्ट्राची एपस्टीन फाईल' असे संबोधले आहे.
सुषमा अंधारे यांच्या पोस्टमध्ये काय?
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर बलात्कार यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर. तटकरे. चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे..."
"अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता", असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Nashik News: ज्योतिषी अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड; महिलांचे 58 VIDEO सापडल्याने खळबळ)
खरातच्या संस्थेंवर रुपाली चाकणकर सदस्या
विशेष म्हणजे खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यांमध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- Palghar News: पैशाची हाव नडली! डहाणूत सरकारी डॉक्टर लाच घेताना ACB च्या जाळ्यात)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे साकडे
"योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का? की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे?" असं देखील सुषमा अंधारे यानी म्हटलं .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world