CSMT-अंबरनाथ लोकलच्या दिव्यांग डब्यात महिलेला बेदम मारहाण, खिडकीजवळ बसण्यावरुन वाद; धक्कादायक Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पुरुष प्रवाशांकडून महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, प्रतिनिधी

लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्याच्या वादानंतर एका प्रवाशाने एका महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून सदर व्हिडिओच्या तपास करून महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर या प्रकरणात ठाणे जीआरपी आणि आरपीएफकडून तपास सुरू असल्याची सांगितले जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला प्रवासीसोबत एक पुरुष प्रवासी वाद घालत असल्याचं दिसत आहे. हा पुरुष प्रवासी आपल्या कुटुंबासोबत असल्याचं दिसत आहे. या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पुरुष प्रवाशांकडून महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली.

नक्की वाचा - Maharashtra Rain : गेल्या 24 तासांत मराठवाड्यात वीज पडून 4 जणांनी गमावला जीव

काही लोकांकडून मध्यस्थी केली जात होती. मात्र मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आवरणं कठीण जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळचा असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी सांगितलं, हा व्हिडिओ काही ग्रुपवर शेअर करण्यात आला होता. त्यामुळे आरपीएफ आणि जीआरपीला हा व्हिडिओ पाठवून या संदर्भातली माहिती घेतली. हा व्हिडिओ सीएसटी- अंबरनाथ लोकलमधील आहे.

Advertisement

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौकशी करून मारहाण करणारी व्यक्ती कोण आहे, ती कुठे राहते, त्याच्या शोध घेतला जात आहे. या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.  याबाबत रेल्वे जीआरपी पोलिसांनी सांगितलं की, या व्हायरल व्हिडिओचा तपास सुरू आहे. सदर व्यक्तीच्या शोध सुरू आहे. लोकलच्या दिव्यांग डब्यात ही घटना घडली आहे. खिडकीजवळ बसण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितले जात आहे.