पुण्यात महिलेची निर्घृणपणे हत्या; डोकं, पाय, हात कापून मुठा नदीपात्रात फेकलं

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या मुठा नदीपात्रातून एका महिलेचं धड सापडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे डोके, हात, पाय कापून वेगळं करण्यात आलं आहे. त्यामुळे महिलेची ओळख पटवणं कठीण झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपास करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं आहे. दरम्यान महिलेची हत्या का केली आणि तो मृतदेह कोणाचा, याचा तपास सुरू आहे. मुठा नदीपात्रात या महिलेचा हात, पाय, डोकं नसलेला मृतदेह सापडला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यात पुण्यात ही भयंकर घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

बातमी अपडेट होत आहे.