कोल्हापूरच्या उद्योजकाला केली डिजिटल अरेस्ट, पुढे जे घडलं ते भयंकर

माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय धमकावून भिती दाखवून त्याच्याकडून ऑनलाईल लाखो रूपये लुटले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण रोजच्या रोज वाढत असताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार नव्या नव्या आयडिया शोधून काढत आहेत. त्यातून ते लाखो रूपयांचा गंडा अनेकांना घालत आहेत. याबाबत तक्रार करण्या ऐवजी घाबरून अनेक जण त्यांच्या धमक्यांना भूलत आहेत. त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र ते डोक्याला हात मारून घेत आहेत. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये झाली आहे. इथे माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय धमकावून भिती दाखवून त्याच्याकडून ऑनलाईल लाखो रूपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापूरात उदय दुधाने हे राहातात. हे राजकारणातही आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून ही काम केलं आहे. शिवाय ते उद्योजक ही आहेत. एक दिवस त्यांना एक वॉट्सअप कॉल आला. आपण एनआयए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी असल्याचे संबधित व्यक्तीने सांगितले. तुम्ही एका दहशतवादी संघटनेला मदत केल्याची आमच्याकडे माहिती असल्याचे त्या व्यक्तीने दुधाने यांना सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर

सहा सप्टेबरला हा कॉल आला होता. हैदराबादच्या एका व्यक्तीने दहशतवाद्यांना 122 कोटींची मदत केली आहे. त्या व्यवहारातून तुमच्या खात्यात वीस ते बावीस कोटी रूपये वर्ग झाले आहेत. हा गंभीर गुन्हा आहे. देशा विरोधात तुम्ही कृती केली आहे. त्यामुळे एनआयचे अधिकारी तुमच्या मागावर आहेत. तुम्हाला मारूनही टाकले जाईल. त्यामुळे तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये राहा. त्यानंतर उदय दुधाने यांनी स्वत:ला डिजिटल अरेस्ट करून घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - CM Arvind Kejriwal resigns : केजरीवालांची मोठी घोषणा, 2 दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन!

शिवाजीपार्क जवळील हॉटेलमध्ये ते लपून बसले होते. त्यावेळी त्यांना वारंवार अधिकारी असल्याचे सांगत कॉल येत होते. त्यामुळे दुधाने हे घाबरून गेले होते. शिवाय मारून टाकण्याची धमकीही हा अधिकारी देत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुधाने यांच्याकडे जवळपास पैशाची मागणी करण्यात आली. हे पैसे ऑनलाईन द्यावेत असेही सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तब्बल 81 लाख रूपये या ठगांच्या बँक खात्यात जमा केले. 

नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

पैसे जमा केल्यानंतर दुधाने यांना फोन येणे बंद झाले. त्यांना काही कळायला मार्ग राहीला नाही.त्यांनी त्यानंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागला नाही. त्यावेळी आपल्याला कोणीतरी गंडा घातला आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते तातडीने हॉटेलच्या बाहेर पडले. त्यांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांना सर्व प्रकार सांगितला. पोलीसांना याबाबत आता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने कोल्हापुरात मात्र खळबळ उडाली आहे.