जाहिरात

10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

देसरकर कुटुंबाला तब्बल दहा वर्षांनी बाळ झालं होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं.

10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सवात देसरकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दारू (Drink and Drive Case) पिऊन कार चालविणाऱ्या दोन तरुणांमुळे चार जणांचा हकनाक बळी गेला. देसरकर कुटुंबाला तब्बल दहा वर्षांनी बाळ झालं होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. बाळाचं बारसं आटपून कुटुंब पुण्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली.   (Chhatrapati Sambhajinagar accident)

मिळालेल्या माहितीनुसार, देसरकर कुटुंबाला दहा वर्षांनंतर बाळ झालं होतं. बाळाचं बारसं आटोपून पुण्याला जात असताना या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले.

Google Job : अलंकृताला गुगलने दिलं 60 लाखांचं पॅकेज, कोणतं पद? कशी असते recruitment process?

हे ही वाचा - Google Job : अलंकृताला गुगलने दिलं 60 लाखांचं पॅकेज, कोणतं पद? कशी असते recruitment process?

अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबेजळगाव येथे हा अपघात झाला. मृणाली अजय देसरकर, आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर (सहा महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर बाळाचे वडील अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवित अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी

दोन्ही आरोपी

छत्रपती संभाजी नगरच्या लिंबेजळगाव येथे झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू

1) मृणालिनी अजय बेसरकर वय 38 वर्ष 

2) आशालता घाटे वय 65 वर्ष 

3)  महिन्याचे बाळ 

4) दुर्गा सागर गीते वय 7 वर्ष

दोन जण जखमी

Latest and Breaking News on NDTV

 आरोपी 

1) विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण, वय 22 वर्ष 

2) कृष्णा कारभारी केरे, वय 19 वर्ष

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
शेकडो तरुणांची नोकरीची स्वप्ने दाखवून फसवणूक, बोगस आर्मी अधिकाऱ्याला बेड्या
10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
Virar ramchandra-kakrani-petrol-pump-owner-murder-solved-16-days
Next Article
10 लाखाची अंगठी, 5 लाखाचे घड्याळ अन् हत्या, 16 दिवसाने सत्य आलं समोर