Dadar News : अचानक आला अन् तरुणीचे केस कापून फरार; दादर स्थानकावर भरगर्दीत नेमकं काय घडलं?

ही तरुण सकाळी साडे नऊच्या सुमारास महाविद्यालयात जात होती, त्यादरम्यान तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील अत्यंत गर्दीचं ठिकाण असलेल्या दादर स्थानकावरुन एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. दादर या स्थानकावर नेहमी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या या स्थानकावरुन जात असताना तरुणी असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून 19 वर्षीय तरुणी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने मागून येत केस कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणी चेंबूर येथील रहिवासी दिनेश गायकवाड (35) याला अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Pune Crime : पुण्याच्या IT कंपनीत तरुणीची हत्या, सहकाऱ्याने पार्किंगमध्ये गाठलं अन्...

पीडित तरुणी सोमवारी सकाळी 9.29 च्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट आरक्षण खिडकीजवळून पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाकडे जाताना तिला अचानक मागून काही तरी टोचल्यासारखं वाटलं. मागे वळून पाहिले असता, एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन घाईघाईने निघून जात असल्याचे दिसलं. यावेळी तिला तिचे केस जमिनीवर पडल्याचेही दिसले. 

यानंतर मुलीने तत्काळ दादर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विभागाला घटनेची माहिती दिली.  त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध घेत होते. घटना घडलेल्या ठिकाणी मंगळवारी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. मात्र त्याने असं का केलं, यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

Advertisement

2017 मध्ये हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांमध्ये महिलांचे केस कापणाऱ्याची दहशत पसरली होती. त्यावेळी अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. 
 

Topics mentioned in this article