Palghar Crime : शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी 8 दिवसांपासून बेपत्ता, अपहरणाचा संशय

संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असल्याने अशोक धोडी यांच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा धोडी कुटुंबाचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असल्याने अशोक धोडी यांच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यांचं अपहरण करण्यात आलं, यामागे काही घातपात आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अशोक धोडी हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा वादावर नेहमीच आक्रमक असायचे त्यामुळे त्यांचे अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय धोडी कुटुंबाकडून व्यक्त केला जात आहे.

बातमी अपडेट होत आहे.